नाश्त्याला आप्पे खायला कोणाला नाही आवडत (Appe Recipe). आप्पे अनेक प्रकारचे केले जातात (Appe Recipe). मुख्यतः डाळ - तांदुळाचे आप्पे आपण खाल्लेच असतील. पण डाळ - तांदळाचे आप्पे करण्याची प्रोसेस फार मोठी आहे (Cooking tips). डाळ - तांदूळ भिजत घालण्यापासून ते आंबवण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो (Food). शिवाय या प्रोसेसमध्ये काही बिघडलं, चूक झाली तर आप्पे व्यवस्थित मनासारखे तयार होत नाहीत.
जर आपल्याला नाश्त्याला रोजचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, इन्स्टंट आप्पे करून पाहा. डाळ - तांदूळ भिजत घालायला विसरले असाल तर, आपण पोह्याचे आप्पे नक्कीच ट्राय करून पाहू शकता. ही नवीन आणि हटके रेसिपी आपण मुलांच्या डब्यालाही तयार करून देऊ शकता. पोह्याचे गुबगुबीत इन्स्टंट आप्पे नेमके करायचे कसे पाहुयात(Poha Suji Appe Recipe, Instant Tiffin Recipe).
पोह्याचे गुबगुबीत इन्स्टंट आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
रवा
बेसन
तेल
पाणी
कांदा
आलं - हिरवी मिरचीची पेस्ट
बेकिंग सोडा
कोणता ब्रेड खाणं तब्येतीसाठी योग्य? व्हाइट की ब्राऊन? कोणता लवकर पचतो, कशाने वाढतं वजन?
गाजर
सिमला मिरची
टोमॅटो
जिरं
मोहरी
उडीद डाळ
कडीपत्ता
कृती
सर्वात आधी मिकरच्या भांड्यात एक कप पोहे, बेसन आणि रवा घ्या. त्याची बारीक पावडर तयार करा. त्यात पाणी घालणं टाळा. तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप दही आणि एक कप पाणी घालून मिक्स करा. त्यावर २० मिनिटांसाठी झाकण ठेवा.
नंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आपल्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या, आलं - हिरवी मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा.
इडल्या फसतात, मऊ-हलक्या होत नाही? परफेक्ट साऊथ इंडियन इडली करण्यासाठी ५ सोप्या टिप्स
फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. नंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरे, हिंग, एक चमचा उडीद डाळ, कडीपत्त्याची पानं घालून तडका तयार करा. तयार तडका बॅटरमध्ये ओता. नंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करा.
दुसरीकडे आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. त्याला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता, व झाकण ठेवा. ५-८ मिनिटानंतर दुसरी बाजूही भाजून घ्या. अशाप्रकारे इन्स्टंट पोह्याचे गुबगुबीत आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे आप्पे चटणी किंवा सॉससोबतही खाऊ शकता.