आपल्याकडे जी व्यक्ती पुरणाचा स्वयंपाक अगदी उत्तम करू शकते, तिला सुगरण म्हटलं जातं. मुळात सुगरणीची पदवी बहाल करतानाच पुरण येतं की नाही, हे आधी विचारलं जातं. यावरून लक्षात येतं की पुरण करणं किंवा पुरणपोळी उत्तम लाटता येणं, हे खरोखरच कौशल्याचं काम आहे. आता सणावाराला नेहमीच पुरण होतं (Puran poli recipe). पण कधीतरी काही गडबड होते आणि नेमकं पुरण सैल होतं (Tips and tricks for perfect puran poli). असं पुरण सैल होऊ नये म्हणून काय करायचं आणि पुरण सैल झालंच तर ते कसं नीट करायचं, हे आता पाहूया....(What to do if puran becomes loose?)
पुरण सैल होऊ नये म्हणून टिप्स१. हरबरा डाळ आणि पाणी यांचं प्रमाण १: २ घ्यावं. यानंतर मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्ट्या होऊन व्यवस्थित पुरण शिजवून घ्यावं.
बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग
२. डाळ शिजल्यानंतर ती एका चाळणीत किमात अर्धा तास तरी टाकून ठेवावी. जेणेकरून जास्तीचं पाणी पुर्णपणे निथळून जाईल. पाणी पुर्णपणे निथळून गेलं आहे की नाही हे तपासून घ्या आणि मगच पुरण चटका द्यायला ठेवा.
पुरण सैल झालंच तर काय करावं....आता वरीलप्रमाणे शिजवूनही पुरण सैल झालंच तर काय करावं, यासाठी ३ गोष्टी लक्षात ठेवा....१. पुरण सैल झालं आहे, हे लक्षात येताच ते पुन्हा कढईमध्ये टाका आणि त्याला पुन्हा एकदा चटका द्या. चटका देताना ते वारंवार हाटावे. पुरण हळू हळू घट्ट होईल.
गणपती डेकोरेशनसाठी ट्रेण्डी लाईटिंग माळ हवी आणि ते ही स्वस्तात? बघा ३ हटके पर्याय...
२. पुरणाला पुन्हा चटका देण्याएवढा वेळ नसेल तर ते सरळ एका ताटात पसरवून टाका आणि ते ताट फ्रिजमध्ये ठेवून द्या. ताटावर झाकण ठेवू नका. यावेळी फ्रिजचा कुलिंग मोड एकदम जास्त करा.
भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत
३. तिसरा उपाय म्हणजे एका स्वच्छ धुतलेल्या सुती कपड्यावर पुरण पसरवून टाका आणि पंखा चालू करा. कपड्याद्वारे पुरणातले अतिरिक्त पाणी शोषले जाईल. एक कपडा पुर्ण ओला झाला तर पुन्हा दुसरा स्वच्छ, कोरडा कपडा घ्या.