आपल्या फ्रीजमध्ये जेली किंवा जॅम नेहमीच पाहायला मिळतात. मुलांना भूक लागली किंवा टिफिनला रोज तेच पदार्थ घेऊन जायला त्यांना आवडत नाही.(Homemade Pomegranate Jelly Recipe) अशावेळी त्याचा हट्ट असतो तो जेली किंवा जॅम खाण्याचा.(Easy 3-Ingredient Jelly) चवीला गोड लागल्यामुळे मुले ते ब्रेड, पोळी किंवा पराठ्यासोबत आवडीने खातात. जेली ही लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील आवडते. पण अनेकदा विकतची जेलीमध्ये असे अनेक पदार्थ घातले जातात जे आरोग्यासाठी चांगले नसतात. (Pomegranate Jam Homemade)
त्यासाठी कोणतेही केमिकल्स न घालता घरच्या घरी केलेली डाळिंबाची जेली एकदा ट्राय करुन पाहा.(How to Make Pomegranate Jelly) पद्धतही अगदी सोपी आहे. मुलांसह आपल्यालाही त्याची चव आवडेल.
कपभर तांदळाच्या पिठाचा करा कुरकुरीत वडा! न थापता करा भरभर वडे, सकाळचा नाश्ता पौष्टिक-झटपट
साहित्य
साखर - ३७० ग्रॅम
डाळिंबाचा ज्यूस - २५० मिली
पाणी - २५० मिली
कॉर्न फ्लोर- ३५ ग्रॅम
बारीक दाण्याची साखर - १५० ग्रॅम
कृती
1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात साखर घाला. नंतर त्यात डाळिंबाचा रस घाला.
2. मिश्रण चांगले ढवळून झाले की, उकळी येऊ द्या.
3. दुसऱ्या पॅनमध्ये पाणी घालून त्यात कॉर्न फ्लोर घालून शिजवून जाडसर पेस्ट तयार करा.
4. त्यात डाळिंबाचे मिश्रण घालून ढवळून घ्या. काचेच्या बाऊलमध्ये तयार मिश्रण घालून सेट करायला ठेवा.
5. सेट झाल्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करा. बारीक दाण्याच्या साखरेत हे तुकडे फिरवून घ्या.
6. घरीच तयार होईल डाळिंबाची जेली. मुलेही आवडीने खातील.