Join us  

हिवाळ्यात फिट राहण्यासाठी पुजा माखिजा सांगतात खास सॅलेड, रेसिपी आणि खास डाएट मंत्र..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 12:56 PM

Food And Recipe: कोशिंबीर आपण नेहमीच करतो. आता या पद्धतीने आंबट- गोड चवीचं एक चवदार सॅलेड (Healthy Salad Recipe For Winter) करून बघा. जेवणाची रंगत नक्कीच  वाढेल. 

ठळक मुद्देभाजी आणि फळं यांचं सुरेख कॉम्बिनेशन असणारी ही रेसिपी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर पुजा माखिजा यांनी शेअर केली आहे

हिवाळ्यात पालेभाज्या, काकडी, बीट, गाजर असे सगळेच भाज्यांचे प्रकार बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हिरव्यागार भाज्यांसाेबत हे रंगबेरंगी सॅलेडचे प्रकार पाहिले की ते सगळे खरेदी करण्याचा मोह होताेच. शिवाय तब्येत कमावण्यासाठीही हिवाळा हा उत्तम ऋतू मानला जातो. त्यामुळे मुबलक मिळणाऱ्या भाज्या हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खायलाच पाहिजेत. आता रोजच्या जेवणात आपण काकडी, बीट, गाजर, टोमॅटो यांची कोशिंबीर करतोच. आता सॅलेडचा (Healthy Salad Recipe For Winter) हा एक प्रकार करून बघा. भाजी आणि फळं यांचं सुरेख कॉम्बिनेशन असणारी ही रेसिपी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर पुजा माखिजा (fitness trainer Pooja Makhija) यांनी शेअर केली आहे (beet root salad recipe).

 

पोमो- बीट सॅलेड रेसिपीसाहित्य बीट

बारीक चिरलेली कोथिंबीर

हिवाळ्यात केस कोरडे झाल्याने फाटे फुटण्याचं प्रमाण वाढतं.. ५ उपाय, स्प्लिट हेअरचा त्रास कमी

डाळिंबाचे दाणे

अर्ध्या लिंबाचा रस

ऑलिव्ह ऑईल

मध

चवीनुसार मीठ 

जीरेपूड, मिरेपूड

 

कृती १. यासाठी सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचं बीट उकडून घ्या.

२. त्यानंतर बीटची साले काढून टाका आणि ते किसून घ्या.

'तब्येतीच्या अनेक समस्यांनी मलाही छळलेय पण तरी मी...", भाग्यश्री सांगतेय पाठदुखी छळते तेव्हा...

३. बीटच्या किसमध्ये अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे टाका.

४. त्यानंतर चवीनुसार मीठ, मध, लिंबाचा रस, जिरेपूड आणि मिरेपूड टाका.

५. तेल तसंच टाकण्याऐवजी मोहरी, हिंग घालून फोडणी दिली आणि नंतर टाकलं तर चव अधिक उत्तम लागेल.

६. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित हलवून घ्या. जेवणात तोंडी लावायला कोशिंबीर म्हणून किंवा मग सकाळच्या नाश्त्याच्या वेळी काहीतरी हेल्दी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही हे सॅलेड खाऊ शकता. 

७. फक्त केल्यावर लगेचच अर्ध्या तासात हे सॅलेड संपवा. कारण हळूहळू त्याच्यातले पौष्टिक गुणधर्म कमी कमी होत जातात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.