सणावाराला आपल्याकडे विविध पदार्थ केले जातात (Poori Recipe). ज्यात पुरी - भाजी, किंवा पुरी - श्रीखंडाचा बेत आवर्जून आखला जातो. गरम तेलात गरमा गरम पुऱ्या कोणाला खायला नाही आवडत (Food). पण पुऱ्या टम्म फुलतीलच असे नाही. काही वेळेस पुऱ्या पापडाप्रमाणे कडक होतात. ज्यामुळे पुऱ्या खाण्याची इच्छा होत नाही (Cooking Tips). त्याची चवही बिघडते.
पुऱ्या फुगण्याऐवजी पापडासारख्या कडक होत असतील तर, कणिक मळण्याची पद्धत बदलून पाहा. जर पुऱ्या मनासारख्या फुलत नसतील, तर पुऱ्या करताना २ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे पुऱ्या छान फुलतील. चवीलाही जबरदस्त होतील आणि पुऱ्या जास्त तेलही पिणार नाहीत(Poori Recipe-How to make Puffy & Soft Poori/Puri).
पुऱ्या फुगण्यासाठी काही सोप्या टिप्स
- पुऱ्या पापडासारखे कडक होत असतील तर, कणिक व्यवस्थित मळून घ्या. कणिक मळताना त्यात २ सिक्रेट पदार्थ मिसळा. कणिक व्यवस्थित मळल्याने पुऱ्या छान फुलतील.
फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ब्रेड कडक - चवही बिघडली? शेफ म्हणतात १ ट्रिक वापरुन पाहा; मिनिटात ब्रेड फ्रेश
- कणिक मळताना फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करू नका. त्यात साखर आणि थोडा रवाही मिक्स करा. यामुळे पुऱ्या छान कुरकुरीतही होतील.
- कणिक मळताना परातीत गव्हाच पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ, ओवा, साखर आणि अर्धी वाटी रवा घाला.
- रवा घातल्याने पुऱ्या कुरकुरीत होतात. साखरेमुळे पुरीची चव दुप्पटीने वाढते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ झाली? ३ गोष्टी करून पाहा; वाढेल ताकद - पन्नाशीतही राहाल फिट
- पुऱ्यांसाठी कणिक मळताना जास्त पाण्याचा वापर करू नका. कणिक घट्ट मळून घ्या. यामुळे पुऱ्या छान फुलतील. जर कणिक सैलसर मळले तर पुऱ्या कडक आणि व्यवस्थित फुलणार नाही.
- कणिक मळून झाल्यानंतर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. कडकडीत गरम झालेल्या तेलातच पुऱ्या तळून घ्या. यामुळे पुऱ्या मऊ आणि छान फुलतील.