पुरी हा भारतीय जेवणातील महत्वाचा भाग (Poori Recipe). पुरी- भाजी, पुरी - श्रीखंड आपण आवडीने खातो. लहानग्यांपासून थोरामोठ्यांनाही पुरी खायला आवडते (Cooking Tips). पण पुरी तेलकट असल्याकारणाने बरेच जण खाणं टाळतात. तेलकट पुऱ्या खाल्ल्याने वजन तर वाढतं (Food). शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
शिवाय पोटाचे विकारही वाढतात. म्हणून आपण इच्छा मारून पुरी खाणं टाळतो. पुऱ्या जर टम्म फुगलेल्या असतील तरच, त्या चविष्ट लागतात. काही वेळेला पुऱ्या व्यवस्थित फुलत नाही. किंवा जास्त तेल शोषून घेतात. जर आपल्या देखील पुऱ्या नीट फुगत नसतील, किंवा जास्त तेल पीत असतील तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. तेल न पिणाऱ्या अगदी टम्म फुलणाऱ्या पुऱ्या तयार होतील(Poori/Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily Pooris).
पुरी फार तेल शोषून घेत असतील तर..
- पुरी तळल्यानंतर जास्त प्रमाणात तेल शोषून घेत असतील तर, सर्वात आधी पुऱ्या लाटून घ्या. नंतर लाटलेल्या पुऱ्या फ्रिजमध्ये ठेवा. १० मिनिटानंतर पुऱ्या बाहेर काढा, कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात पुऱ्या तळून घ्या. या टीपमुळे पुऱ्या जास्त प्रमाणात तेल पिणार नाही.
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
- पुऱ्या करताना कणिक व्यवस्थित भिजवणे गरजेचं आहे. यासाठी कणिक मळताना त्यात दही आणि चमचाभर तेल घाला. आपण कोमट पाण्याचा वापर करूनही कणिक मळू शकता. कणिक मळताना घट्ट मळून घ्या. १० मिनिटांसाठी कणिक झाकून ठेवा. नंतर कणकेच्या पुऱ्या लाटून घ्या.
कायम हिमोग्लोबिन कमी होतं, अंगात रक्त कमी? ’हे’ ४ पदार्थ खाणं करा बंद-आयर्न होते कमी
- पुरी तळताना कढईत जास्त तेल घाला. तेल गरम असावे. गरम तेलात पुऱ्या तळल्याने पुऱ्या तेल शोषून घेणार नाहीत. शिवाय पुऱ्या छान टम्म फुलतील.
- पुऱ्या अनेकदा मऊ होतात, तळल्यानंतर कुरकुरीत होत नाहीत. यासाठी आपण कणिक मळताना त्यात तांदुळाचं पीठ घालू शकता. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील.