Join us  

पॉपकॉर्न नेहमीच खाता, आता पॉपकॉर्न सूप प्या- ही घ्या कुणाल कपूर यांनी शोधून काढलेली भन्नाट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 10:57 AM

Popcorn Soup Recipe By Celebrity Chef Kunal Kapur: पॉपकॉर्न सूप हा पदार्थ ऐकूनच खूप वेगळं वाटतंय ना, पण ही रेसिपी अतिशय चवदार होते आणि थंडीसाठी तर अगदी उत्तम आहे, असं सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगत आहेत... (winter special food and recipe)

ठळक मुद्देमस्त गारेगार थंडीत गरमागरम पॉपकॉर्न सूप पिण्याचा आनंद लूटा...

गरमागरम कुरकुरीत  पॉपकॉर्न खात टीव्ही, सिनेमा बघणं हा अनेकांचा आवडीचा कार्यक्रम. अनेकदा जेव्हा मित्रमैत्रिणी किंवा नातलग एकत्र जमतात आणि नाईटआऊटचा कार्यक्रम होतो, तेव्हा रंगलेल्या गप्पांमध्ये तोंडी लावायला पॉपकॉर्न पाहिजेच असतात. त्याशिवाय गप्पांचा फड मस्तपैकी जमून येत नाही. हिवाळ्यातही उबदार शाल अंगावर घेऊन घरात बसून पॉपकॉर्न खाण्याची मजा काही वेगळीच असते (winter special food and recipe). आता सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी या पॉपकॉर्नसोबतच एक मस्त प्रयोग केला आहे (Popcorn soup recipe by celebrity chef Kunal Kapur) आणि त्याचं चक्क सूप कसं करायचं याचा व्हिडिओ शेअर केला आहे (How to make popcorn soup). बघा नेमकं कसं केलंय त्यांनी हे यम्मी, टेस्टी पॉपकॉर्न सूप...(Healthy soup recipe for winter)

 

पॉपकॉर्न सूप करण्याची रेसिपी

साहित्य

३ बाऊल पॉपकॉर्न

२ टेबलस्पून तूप

१ कप क्रिम

संत्र्यांच्या साली फेकू नका, कुंडीतल्या रोपांसाठी टॉनिक! ४ जबरदस्त फायदे- बघा कसा करायचा वापर

१ बारीक चिरलेला कांदा

२ टेबलस्पून कोथिंबीरीच्या काड्या

१ टीस्पून लसूण

१ टीस्पून आलं

ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी निवडायची? बघा ६ टिप्स- दिसाल आणखी सुंदर- आकर्षक

चिमुटभर हळद आणि हिंग

चवीनुसार मीठ

कडिपत्त्याची ७ ते ८ पानं

१ टीस्पून जीरे

 

रेसिपी 

१. सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की त्यात तूप किंवा बटर घाला.

पॅरिसच्या हॉटेलमध्ये एका महिलेची ६. ७ करोडची अंगठी हरवली आणि चक्क...... पाहा कुठे सापडली

२. तूप किंवा बटर वितळल्यानंतर त्यात हळद आणि थोडं हिंग घाला. जीरे, लसूण, आलं, कोथिंबीरीच्या बारीक चिरलेल्या काड्या, कांदा, कडिपत्ता असं सगळं एकेक टाकून चांगलं परतून घ्या.

३. यानंतर त्यामध्ये पॉपकॉर्न टाका सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि साधारण २ ते ३ कप पाणी टाकून कढईवर झाकण ठेवून द्या.

 

४. आतल्या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करा. हॅण्डमिक्सर फिरवून हे मिश्रण बारीक करून घ्या.

मोठ्या हौशीने भाज्यांचं लोणचं घालता, पण लगेच खराब होतं? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभर टिकेल लोणचं

५. आता बारीक केलेलं मिश्रण मोठ्या गाळणीने गाळून घ्या. गाळलेला सूपचा भाग एका पातेल्यात टाका. खूप घट्ट झालं असेल तर त्यात पाणी टाकून सूपप्रमाणे पातळ करून घ्या..

५. चवीनुसार मीठ आणि क्रिम टाकून सूप उकळून घ्या.. मस्त गारेगार थंडीत गरमागरम पॉपकॉर्न सूप पिण्याचा आनंद लूटा...

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर