Join us  

कुरकुरीत बटाट्याची चटणी करून पाहा, १० मिनिटांत खा चमचमीत पदार्थ - वाढेल जिभेची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 10:00 AM

Potato chutney - Simple But Splendid : झटपट तयार करा कुरकुरीत बटाट्याची चटणी

बटाटा (Potatoes) ही एक अशी भाजी आहे, जे चाटपासून बर्गरपर्यंत प्रत्येक गोष्टीत वापरली जाते (Potato Chutney). काही लोकांना बटाटे खायला इतके आवडतात की रायतापासून चटणीपर्यंत सर्व गोष्टीत बटाटा वापरतात (Cooking Tips). बटाट्याचे अनेक पदार्थ केले जाते. बटाटा सहसा प्रत्येक पदार्थ फिट होतो. बटाट्याची भाजी, आमटी, पराठे आपण खाल्लेच असतील (Food).

पण कधी बटाट्याची चटणी कधी ट्राय करून पाहिलं आहे का? आत तुम्ही म्हणाल चटणी लसूण, आलं, हिरवी मिरची किंवा शेंगदाण्याची चटणी केली जाते. पण बटाट्याची चटणी हा नवीन प्रकार आहे. जर आपल्याला चटणीमध्ये काहीतरी हटके करून पहायचं असेल तर, बटाट्याची चटणी हा उत्तम पर्याय आहे. आपल्याला ही चटणी नक्कीच आवडेल(Potato chutney - Simple But Splendid).

बटाट्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

जिरं

लसूण

कडीपत्ता

कांदा

बटाटा

शेंगदाण्याचं कूट

डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

हिरवी मिरची

मीठ

लाल तिखट

कोथिंबीर

कृती

सर्वात आधी तवा गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चमचाभर तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, ठेचलेला लसणाच्या ६ - ७ पाकळ्या, कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात बटाट्याचे लांब केलेले काप घालून भाजून घ्या.

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

कांदा - बटाटा लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात कपभर शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चमचाभर लाल तिखट घालून साहित्य एकजीव करा. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणि डिश सर्व्ह  करा. अशा प्रकारे कुरकुरीत बटाट्याची चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स