Join us  

नाश्त्याला करा २ बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे; इन्स्टंट रेसिपी; अगदी १० मिनिटात क्रिस्पी डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 3:59 PM

Potato Crispy Medu Vada Recipe | Crispy Medu Vada for Breakfast : डाळ - तांदूळच कशाला? कच्च्या बटाट्याचाही करता येतो मेदू वडा

साऊथ इंडियन पदार्थांची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. इडली, डोसा, आप्पे आणि मेदू वडे नाश्त्यासाठी बेस्ट मानले जातात (Medu Vada). हे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला फायदाच होतो (Cooking Tips). या पदार्थांमध्ये कुरकुरीत मेदू वडे खायला प्रत्येकाला आवडते. उडीद डाळ भिजत घालून, त्याची पेस्ट तयार करून मेदू वडे केले जातात. पण मेदू वडे कधी फसतात, तर कधी कुरकुरीत होत नाहीत.

अनेकदा घरात उडदाची डाळ उपलब्ध नसते, अशावेळी आपण बटाट्याचा देखील मेदू वडा करू शकता. बटाट्याचे वडे आपण खाल्ले असतील. पण आता कच्च्या बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे करून पाहा. अगदी १० मिनिटात ही रेसिपी तयार होते(Potato Crispy Medu Vada Recipe | Crispy Medu Vada for Breakfast).

बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

रवा

मोहरी

हिरवी मिरची

आलं

लसूण

चिली फ्लेक्स

मीठ

तेल

अशा पद्धतीने करा कुरकुरीत बटाट्याचे मेदू वडे

रवा-बेसनाचा करा इन्स्टंट ढोकळा, फक्त १५ मिनिटांत स्पॉन्जी ढोकळा रेडी, शाळेच्या डब्यासाठी मस्त खाऊ

सर्वात आधी २ बटाट्याचे पीलरने साल काढून घ्या. नंतर किसणीने बटाटे किसून घ्या. एका बाऊलमध्ये किसलेला बटाटा घ्या. त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या.

एका कढईमध्ये २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, लसूण, एक चमचा पांढरे तीळ आणि चिल्ली फ्लेक्स घालून मिक्स करा. साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यात २ कप पाणी घाला. पाणी गरम झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात किसलेला बटाटा आणि एक कप रवा घालून मिक्स करा.  त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

तयार मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. हाताला तेल लावा, व छोटा गोळा घेऊन मेदू वड्याचा आकार द्या. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात वडे सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. अशा प्रकारे कच्च्या बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी रेडी.

मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चमचमीत चटणी

पोह्याचे आप्पे एकदा खाऊन तर पाहा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट होणारा पौष्टीक पदार्थ, चवीलाही उत्तम

पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ४ ते ५ लाल सुक्या मिरच्या, ६ ते ७ लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या, व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात एक कप भाजलेली चणा डाळ, अर्धा कप किसलेलं खोबरं, एक चिंच घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात थोडं पाणी घाला. पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. नंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी, कडीपत्ता, हिंग घालून मिक्स करा. तयार फोडणी पेस्टमध्ये ओता. अशा प्रकारे मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स