Join us  

डाळ - तांदूळ भिजवण्याची झंझटच कशाला? अगदी १० मिनिटात रवा - बटाट्याचा करा कुरकुरीत डोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 3:47 PM

potato dosa recipe | crisp dosa with aloo puree : नाश्त्यासाठी झटपट तयार करा रवा बटाट्याचा कुरकुरीत डोसा

सकाळचा पहिला आहार हा हेल्दी असायला हवा (Dosa Recipe). नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा देते. पण रोज काय खावं असा प्रश्न पडतो. पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडे हे पदार्थ आपण खातोच (Food). शिवाय हे पदार्थ हेल्दीही असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक पौष्टीक घटकही मिळतात (Cooking Tips). साऊथ इंडियन पदार्थ आपण आवडीने खातो. पण रोज हे पदार्थ करणं कठीण आहे.

डाळ - तांदूळ भिजत घालण्यापासून ते करण्यापासून यात बराच वेळ जातो. जर आपल्याला झटपट डोसा खाण्याची इच्छा होत असेल तर, रवा बटाट्याचा कुरकुरीत डोसा करून पाहा. अगदी घरगुती साहित्यात रवा - बटाट्याचा डोसा तयार होईल. आपण हा डोसा मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता(potato dosa recipe | crisp dosa with aloo puree).

रवा - बटाट्याचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

बटाटा

हिरवी मिरची

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

मीठ

पाणी

चिली फ्लेक्स

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक बारीक चिरलेला कच्चा बटाटा घाला. नंतर त्यात ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात एक कप रवा घाला आणि वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक छोटी वाटी तांदुळाचं पीठ, एक चमचा चिली फ्लेक्स, एक चमचा जिरं, एक बारीक चिरलेला कांदा आणि एक वाटी पाणी घालून मिक्स करा.

शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. १५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून रवा छान फुलेल. १५ मिनिटानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा तापल्यानंतर ब्रशने तेल लावा. त्यावर चमचाभर बॅटर ओता. डोश्यावर ब्रशने तेल लावा, व दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घ्या.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स