Lokmat Sakhi >Food > श्रावणी सोमवार उपवास स्पेशल बटाट्याची खीर! उपवासाला एनर्जी आणि आनंद देणारा खास प्रकार

श्रावणी सोमवार उपवास स्पेशल बटाट्याची खीर! उपवासाला एनर्जी आणि आनंद देणारा खास प्रकार

उपवासाला शरीराला तरतरी देणारा पदार्थ खाणं (fasting food) आवश्यक आहे. अशा पदार्थांमध्ये खिरीचा अवश्य समावेश होतो. जिभेला आणि मनाला आनंद देणारा सोबतच शरीराला ऊर्जा देणारा खिरीचा प्रकार म्हणजे बटाट्याची खीर (potato kheer) . करण्यास (how to make potato kheer) अत्यंत सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2022 05:16 PM2022-08-14T17:16:26+5:302022-08-14T17:20:01+5:30

उपवासाला शरीराला तरतरी देणारा पदार्थ खाणं (fasting food) आवश्यक आहे. अशा पदार्थांमध्ये खिरीचा अवश्य समावेश होतो. जिभेला आणि मनाला आनंद देणारा सोबतच शरीराला ऊर्जा देणारा खिरीचा प्रकार म्हणजे बटाट्याची खीर (potato kheer) . करण्यास (how to make potato kheer) अत्यंत सोपी.

Potato kheer for fasting. How to make potato kheer? | श्रावणी सोमवार उपवास स्पेशल बटाट्याची खीर! उपवासाला एनर्जी आणि आनंद देणारा खास प्रकार

श्रावणी सोमवार उपवास स्पेशल बटाट्याची खीर! उपवासाला एनर्जी आणि आनंद देणारा खास प्रकार

Highlights खिरीसाठी बटाटे एकदम मऊ शिजवून घ्यावेत. दुधात उकडून कुस्करलेला बटाटा घातल्यानंतर खीर कमीत कमी 10 मिनिटं उकळली तरच छान दाटसर होते. 

श्रावणात कोणाचे महिनाभर उपवास असतात, कोणाचे वरचेवर तर कोणी केवळ श्रावणी सोमवाराला उपवास करतात. उपवास श्रध्देने केला जातो. पण उपवासाच्या दिवशी जर योग्य आहार (healthy diet for fasting)  घेतला गेला नाही तर मात्र दिवसभर उत्साह राहात नाही, गळवटा येतो. त्यामुळे चिडचिडही होते. म्हणजे ज्या मानसिक समाधानासाठी श्रध्देने उपवास केला जातो तो उद्देशच यामुळे हरवला जातो. श्रावणातल्या सोमवारी उपवास धरताना अनेकजण मीठ खात नाही. बिगर मिठाचे पदार्थ खाणं अनेकांना नकोसं होतं. यामुळेच शरीरातला उत्साह आणि ऊर्जा हरवते. हे होवू नये यासाठी उपवासाला ताकद देणारे पदार्थ करायला हवेत. असाच एक पदार्थ म्हणजे बटाट्याची खीर. उपवासाला बटाट्याची खीर (potato kheer)  खाल्ल्यानं शरीराला ताकद मिळते. ही खीर झटपट (how to make potato kheer)  होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते.

Image: Google

बटाट्याची खीर कशी करावी?

बटाट्याची खीर करण्यासाठी फारशी सामग्री लागत नाही. दूध, उकडलेले बटाटे, चवीनुसार साखर सुकामेवा, वेलची पूड आणि थोड्या केशर काड्या घ्याव्यात. बटाट्याची खीर करताना सर्वात आधी बटाटे अगदी मऊ उकडून घ्यावेत. एका मोठ्या भांड्यात दूध गरम करायला ठेवावं. दूध उकळायला लागलं की चमच्यानं दूध सतत हलवत राहावं. दूध घट्टसर होईपर्यंत उकळावं. उकडलेले बटाटे सोलून चांगले कुस्करुन घ्यावेत. दूध घट्ट झालं की त्यात साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा चांगलं उकळावं. मिश्रणाला मंद गॅसवर उकळवत उकळी फुटली की त्यात कुस्करलेला बटाटा घालावा. बटाटा दुधात चांगला मिसळून घ्यावा. नंतर मिश्रणात सुकामेवा घालावा. वेलची पूड घालून खीर चांगली हलवून घ्यावी. 

 Image: Google

दुधात केशर काड्या अर्धा तास भिजवाव्या. हे दूध खिरीमध्ये घालावं. कुस्करलेला बटाटा आणि सुकामेवा घातल्यानंतर खीर कमीतकमी 10 मिनिटं उकळावी. यामुळे खीर छान दाटसर होते. खीर घट्ट व्हायला लागली की गॅस बंद करावा. ही खीर गार झाली की ती थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावी. थंड झालेली खीर खाण्यास छान लागते.  ही खीर खाल्ल्यानं चविष्ट पदार्थ खाण्याचा आनंद तर मिळतोच सोबतच उपवासाला हवी असलेली तरतरीही मिळते. 

Web Title: Potato kheer for fasting. How to make potato kheer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.