Lokmat Sakhi >Food > बटाट्याच्या सालांचे वेफर्स, कशी वाटली आयडिया? करा ५ मिनिटांत कुरकुरीत खाऊ-पोषणही भरपूर...

बटाट्याच्या सालांचे वेफर्स, कशी वाटली आयडिया? करा ५ मिनिटांत कुरकुरीत खाऊ-पोषणही भरपूर...

How To Make Potato Skin Chips : Homemade Potato Skin Chips : Crispy Potato Skin Chips : बटाटा सोलून साली फेकून देऊ नका मधल्या वेळेत भूक लागली तर खाण्यासाठी करा मसालेदार चिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 07:05 AM2024-08-30T07:05:16+5:302024-08-30T07:15:24+5:30

How To Make Potato Skin Chips : Homemade Potato Skin Chips : Crispy Potato Skin Chips : बटाटा सोलून साली फेकून देऊ नका मधल्या वेळेत भूक लागली तर खाण्यासाठी करा मसालेदार चिप्स...

Potato Skin Chips Easy Potato Peel Chips Homemade Potato Skin Chips Crispy Potato Skin Chips | बटाट्याच्या सालांचे वेफर्स, कशी वाटली आयडिया? करा ५ मिनिटांत कुरकुरीत खाऊ-पोषणही भरपूर...

बटाट्याच्या सालांचे वेफर्स, कशी वाटली आयडिया? करा ५ मिनिटांत कुरकुरीत खाऊ-पोषणही भरपूर...

प्रत्येकाच्या किचनमध्ये कधीही गेलो तरी कायम असणारा एक खास पदार्थ म्हणजे बटाटा. बटाटा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. बटाट्याचे एकापेक्षा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. बटाट्याचे पदार्थ करताना काही पदार्थांमध्ये आपण बटाटा त्याच्या सालीसकट वापरतो तर कधी साल काढून बटाट्याचा वापर करतो. बटाट्याची भाजी, भजी, काचऱ्या असे अनेक पदार्थ तयार करण्याआधी आपण कच्च्या बटाट्याच्या साली काढून घेतो( Homemade Potato Skin Chips).

या साली शक्यतो आपण कचऱ्याच्या डब्यांत फेकून देतो. परंतु या सालींचा (Crispy Potato Skin Chips) वापर करुन आपण त्यापासून अगदी कमी साहित्यात झटपट होणारे कुरकुरीत चिप्स तयार करु शकतो, असे म्हटलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु खरंच आपण या बटाटयाच्या सालींचा वापर करुन टी टाइम स्नॅक्ससाठी म्हणून खाता येणारे चटपटीत, मसालेदार चिप्स घरच्याघरी तयार करु शकतो. बटाट्याच्या साली फेकून न देता त्याचा वापर करुन चटपटीत, कुरकुरीत, मसालेदार चिप्स कसे तयार करायाचे याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Potato Skin Chips).

साहित्य :- 

१. कच्च्या बटाटाच्याच्या साली - २ कप 
२. मीठ - चवीनुसार 
३. चाट मसाला - चवीनुसार 
४. लाल तिखट मसाला - चवीनुसार 

घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...


बिर्याणी पातेल्यात खाली लागू नये म्हणून शेफ कुणला कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक-बिर्याणी करा परफेक्ट...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात या बटाटयाच्या साली घालून ५ ते १० मिनिटे पाण्यांत भिजवत ठेवाव्यात. 
२. त्यानंतर या साली स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुवून घ्याव्यात. 
३. आता एक टिश्यू पेपर अंथरुन त्यावर या स्वच्छ धुतलेल्या साली पसरवून घ्याव्यात. या सालींच्या वरून देखील एक टिश्यू पेपर ठेवून या सालीतील अतिरिक्त पाणी शोषून घ्यावे. 

पारंपरिक बेने डोसा फक्त १० मिनिटांत करण्याची पाहा भन्नाट कृती, पारंपरिक साऊथ इंडियन डोसा... 

४. आता एका कढईत तेल घेऊन तेल व्यवस्थित गरम करुन घ्यावे. या गरम तेलात बटाट्याच्या साली सोडून त्या गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात. 
५. तळून घेतलेल्या बटाट्याच्या साली एका बाऊलमध्ये काढून त्यावर चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, चाट मसाला भुरभुरवून हे वेफर्स थोडे हलवून घ्यावेत. जेणेकरुन सगळा मसाला व्यवस्थित या बटाट्याच्या चिप्सला लागेल. 

बटाट्याच्या साली फेकून न देता त्यापासून झटपट तयार होणारे चिप्स खाण्यासाठी तयार आहेत.   

Web Title: Potato Skin Chips Easy Potato Peel Chips Homemade Potato Skin Chips Crispy Potato Skin Chips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.