Join us

वरण-भातासह तोंडी लावण्यासाठी करा खमंग बटाटा तवा फ्राय, जमेल फक्कड बेत - सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 16:57 IST

Potato Tawa Fry Recipe : बटाट्यााचे काप तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण  बटाटा तवा फ्राय ही रेसेपीसुद्धी तितकीच चविष्ट चवदार आहे.

रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं असावं असं नेहमीच वाटतं. कारण सतत तेच तेच खाऊन खूपच कंटाळा येतो.  डाळ- भात किंवा चपाती खाताना तोंडी लावणीसाठी लोणचं, चटणी असेल तर जेवणाची मजा येते. बटाटा अनेकांच्या घरी रोज खाल्ला जातो. (Potato Tawa Fry Recipe) काहीजण प्रत्येक भाजीत बटाटा घालतात. बटाट्यााचे काप तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण  बटाटा तवा फ्राय ही रेसेपीसुद्धी तितकीच चविष्ट चवदार आहे. (Batatyache Kap) डाळ भाताबरोबर तुम्ही ही रेसेपी ट्राय करू शकता.  बटाटा तवा फ्राय करण्यासाठी फक्त ५ ते १० मिनिटं लागतील. या पदार्थाला तुम्ही आलू फ्राय, बटाटे फ्राय किंवा बटाट्याचे तळणीचे काप म्हणू शकता. (Batatyache Kap or Batatyache kap recipe)

साहित्य

२ कापलेले बटाटे

लाल तिखट

हळद

लसूण पेस्ट

कढीपत्ता

तेल

चवीनुसार मीठ

मोहोरी, 

जीरं

कृती

१) सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून घ्या. त्यानंतर बटाट्याचे पातळ काप करून घ्या. 

२) तुमच्याकडे थोडावेळ  असेल तर हे काप पाण्यात सोडा  घालून थोडावेळ भिजवून ठेवा

३) त्यानंतर तव्यावर तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, लसणाची पेस्ट, कढीपत्ता घाला.

ना मावा ना साखरेचा पाक; फक्त १ कप दुध वापरून करा १ किलोंची स्वादीष्ट मिठाई

४) फोडणी घातल्यानंतर त्यात बटाट्याचे काप घाला.

५)  बटाट्याचे काप घातल्यानंतर  मसाले घालून परतून घ्या आणि ५ ते १० मिनिटांसाठी शिजत ठेवा.  तयार आहेत कुरकुरीत खमंग, बटाटा तवा फ्राय. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न