Join us  

पश्चिम बंगालमधली पौष संक्रांत आणि बंगाली नोलेन गुरेर पायेश, तालासुरात रंगलेला उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 5:00 PM

मकर संक्रांत विशेष: भारतात विविध नावांनी साजरा होणारा सण बंगालमध्ये पौष संक्रांत म्हणून साजरा होतो.

ठळक मुद्देइतकेच काय पण मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्सपण खास पौष संक्रांत मेनू ठेवतात. अंगाला मुंग्या येतील इतकी विविध पक्वान्न यावेळी आढळतील.

शुभा प्रभू साटम

मकर संक्रांत पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती म्हणून ओळखली जाते.  भारतातील अन्य राज्यांप्रमाणे इथेही संक्रांत हा सामूहिक सण असतो. अन्य कोणतेही सण तुम्ही बघितलेत तर बऱ्यापैकी खाजगी दिसतील. अगदी दिवाळीपण तथापि संक्रांत मात्र सामूहिक. पश्चिम बंगालपण त्याला अपवाद नाही.वंग प्रांत आणि लोक तसे रसिक आणि अभिजन. त्यामुळे एकत्र जमून गाणी गीते संगीत यांचा आस्वाद घेणे साहजिक असते.

इथे या काळात नवा गूळ, नोतोन गुड येतो. आपला उसाचा गूळ नव्हे तर ताडाचा गूळ. आणि ही इथली खासियत. जसा हापूस आंबा महाराष्ट्राचा तसाच इथे नोतोन गुड. साहजिकच संक्रांतीचे पक्वान्न यापासून तयार करणे आवश्यक.

(Image : google)संक्रांत सण घरात एकटे राहून तो साजरा होत नसतो. माणसांची बेटे होण्याआधी इथे आपल्या देशात कृषी सामूहिक जीवन होते. काही प्रमाणात आजही ग्रामीण भारतात आढळते. संक्रांतीच्या निमित्ताने शहरी अभिजनपण आपल्या मूळ आयुष्याची आठवण ताजी करतात. माणूस हा सामाजिक प्राणी आहे याचा अनुभव या सणातून येतो. आणि जगणे हे ऋतूनुसार हवे याचा पाठ परत मिळतो. तो सुद्धा तिळगुळाच्या गोडव्यात माखूनच!

(Image : google) 

पौष संक्रांतीला कोणते पदार्थ करतात?१. बंगाली आणि मिठाई वेगळ्याने ओळख करून द्यायला नको. बंगाली मिठाई आणि त्याहीपेक्षा त्यांची काव्यात्मक नावे प्रसिद्ध आहेतच. संक्रांत काळात बंगाली आपल्या लाडक्या छेन्याला मात्र थोडे लांब ठेवून ताड गूळ अधिक वापरतात.२. तलेर प्रतिषपदा पिठा यावेळी असणारच. ताड गूळ, दूध आणि नारळ यांचे सारण असणारे गोड घावन.३. खजूर गुरेर पायेष,आपली तांदूळ खीर पण गूळ आणि गोबिंदभोग तांदुळाची. अमळ घट्ट अशी.४.  नारकेल दूध पुलाव म्हणून एक अफाट प्रकारपण या सणात होतो. थोडाफार आपल्या नारळी भातासारखा पणं गोड नाही. कोणत्याही तिखट रस्स्यासोबत उत्तम जुळणारा. 

(Image : google)५. याशिवाय संदेश असणारच. ६. तुलनेत पश्चिम बंगालमध्ये तीळ कमी दिसतात. पण नवा गूळ, नवा तांदूळ त्यातही गोबिंदभोग,नारळ/ओले खोबरे यांची रेलचेल दिसेल.७. आपली पारंपरिक संस्कृती जपण्यात बंगाली हुशार आहेत. बाजारात जागोजागी पक्वान्न तयार होत असतात. ८. घोळदार धोतर सावरत आणि साड्या आवरत पूर्ण बंगाली जोंता रस्त्यावर उतरते. कोणी काव्य संमेलनाला जाते तर कोणी संगीत महोत्सव.९. इतकेच काय पण मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्सपण खास पौष संक्रांत मेनू ठेवतात. अंगाला मुंग्या येतील इतकी विविध पक्वान्न यावेळी आढळतील.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :पश्चिम बंगालअन्नमकर संक्रांती