डायबिटीक रुग्णांना सणाच्या कालावधीत मिठाईपासून वंचित राहावे लागते. एकीकडे घरातील प्रत्येक व्यक्ती मिठाईचा आनंद लुटतात. मात्र, दुसरीकडे डायबिटीक रुग्ण मिठाई खाऊ शकत नाही. त्यामुळे खास डायबिटीक रुग्णांसाठी शुगर फ्री मिठाईची सोपी पद्धत. घरातील साहित्यात शुगर फ्री ड्रायफ्रुट लाडू सहज करता येतील. ही घ्या रेसिपी.
शुगर फ्री लाडू करायचे तर..
१ वाटी बारीक चिरून घेतलेले बदाम १ वाटी बारीक चिरून घेतेलेले काजू १ वाटी बारीक चिरून घेतेलेले आक्रोड १ वाटी पिस्ता १०० ग्राम किशमिश१०० ग्राम खजूर ३ मोठे चमचे तूप गुलाबाचे पाकळ्या १ मोठा चमचा इलायची पावडर १ ग्लास पाणी केसर
कृती
सर्वप्रथम एका बाउलमध्ये चिरून घेतलेले काजू, बदाम, पिस्ता, आक्रोट मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेऊन त्यात तूप टाकायचे आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यात चिरून घेतेलेले ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यानंतर त्या बाउलमध्ये पुन्हा काढून ठेवावे.
त्यानंतर तुम्हाला शुगर फ्री सिरप बनवायचे आहे. त्याच कढाईत १ ग्लास पाणी टाकायचे, पाणी गरम झाल्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकायचे आहेत. त्यानंतर खजूर आणि किशमिशची बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायची. हे मिश्रण घट्ट होऊपर्यंत ढवळत राहायचे आहे. मुख्य म्हणजे या मिश्रणातूनच या लाडूला गोडवा येणार आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात भाजून घेतेलेले ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहेत. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात केसर आणि वेलची पावडर टाकायची आहे.
हे मिश्रण थंड होण्यासाठी एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर हातावर तूप लावून लाडू वळायचे. अश्याप्रकारे आपल्या डायबिटीक रुग्णांसाठी लाडू खाण्यासाठी रेडी.