Join us  

कुकरमध्ये केक बनवताना ५ चुका टाळा ! बेकरीसारखा मस्त सॉफ्ट, लुसलुशीत केक होईल झटपट तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 11:11 AM

5 tips to keep in mind while baking a cake in a cooker : केक करायचा विचार करताय ? पण घरी ओव्हन नाही... कुकरमध्येही मस्त स्पाँजी केक तयार करता येताे...

आजकाल छोट्या - मोठ्या खास प्रसंगासाठी, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, छोटेखानी पार्टी असेल तर हमखास केक मागवला जातो. केक शिवाय कोणते सेलिब्रेशन होणे म्हणजे अधूरेचं आहे. वाटत कोणत्या ना कोणत्या खास क्षणांसाठी केक हा लागतोच, यासाठी काही गृहिणी तो घरीच बनवण्याचा प्रयत्न करतात. केक घरी करायचा म्हटलं तर कुणाचे बेत फसले जातात तर कुणाचे केक छान जमून येतात. केक करण्यासाठी, तो चांगला फुलून यावा (5 Essential Tips To Keep In Mind While Baking Cake In A Cooker) यासाठी तो मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्येच बनवण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु कुणी आपल्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नाही म्हणून केक करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत  तर कुणी कुकरमध्येही (Cooker Cake) उत्तम केक करतात(Sponge Cake in Pressure Cooker).

कुकरमध्ये केक करताना किती वेळ आणि कसा बेक करायचं, याचं गणित जर का एकदा जमलं तर याहून मोठं सुखं नाही. केक तयार करताना ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नाही ते कुकर मध्येच केक (How To Make Cake In Pressure Cooker) बनवतात. कुकरमध्ये केक तयार करताना कधी केक फुगलाच नाही, तर कधी तो कच्चाच राहून गेला अशा अनेक समस्या समोर येतात. काहीवेळा कुकरमध्ये (How To Bake A Cake In A Cooker) केक तयार झाला की तो चांगला होतो तर काहीवेळा फसतो. असे होऊ नये, तसेच कुकरचा वापर करुन परफेक्ट मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये बनवतात तास केक बनवण्यासाठी काही खास टिप्स (5 tips to keep in mind while baking a cake in a cooker) लक्षात ठेवूयात. कुकरमध्ये केक कसा करायचा, याचं अचूक तंत्र एकदा समजलं तर आपण देखील तितकाच मऊ, लुसलुशीत केक घरीच बनवू शकतो(Pressure cooker baking: Important tips for baking a cake in a pressure cooker).

कुकरमध्ये केक बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ? 

१. योग्य कुकरचा वापर :- कुकरमध्ये केक बनवण्यापूर्वी सर्वप्रथम त्यासाठी योग्य कुकरची निवड करणे अतिशय महत्वाचे असते. केक बनवण्यासाठी नेहमी जाड तळ आणि घट्ट झाकण असलेलाच कुकर वापरावा. यासोबतच कुकरमध्ये केक बेक करण्यासाठी ठेवताना झाकणाचे गॅस्केट काढून झाकण लावावे. याशिवाय केक बनवण्यापूर्वी कुकर ५ मिनिटे व्यवस्थित प्री - हिट करुन घ्यावा. यामुळे केक व्यवस्थित फुलून तयार होतो. 

वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...

२. कुकरमध्ये स्टॅण्डचा वापर करावा :- कुकरमध्ये केक बेक करायला ठेवण्यापूर्वी स्टीलच्या स्टॅण्डचा वापर करावा. ज्या भांड्यात आपण केक बॅटर ओतले आहे ते भांडे डायरेक्ट कुकरमध्ये ठेवण्याची चूक करु नये. असे केल्यास केक खालून करपू शकतो. यासाठी कुकरमध्ये सर्वातआधी एक स्टीलचे स्टॅण्ड ठेवून मगच त्यावर केकचे बॅटर असणारे भांडे ठेवावे. यामुळे केक खालून न करपता व्यवस्थित मऊ, लुसलुशीत बनतो. 

भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...

३. केक बॅटरमध्ये व्हिनेगर मिसळा :- जर आपल्याला बेकरीप्रमाणे मऊ आणि स्पॉन्जी केक घरी बनवायचा असेल, तर या केकच्या बॅटरमध्ये अर्धा चमचा  व्हिनेगर घालावे. 

साजूक तुपाला बुरशी लागून खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स, रवाळ, दाणेदार तूप टिकेल वर्षानुवर्षे...

४. या तापमानावर केक बेक करुन घ्या :- जर आपण कुकरमध्ये केक बनवत असाल, तर गॅसची आच पूर्णवेळ मध्यम ठेवा. ओव्हनपेक्षा गॅसवर केक बनवायला जास्त वेळ लागतो त्यामुळे अजिबात घाई करू नका. यासोबतच केकच्या बरोबर मधोमध टूथपिक रोवून आपण एक किंवा दोन वेळा हा केक आतून व्यवस्थित शिजला आहे की नाही ते पाहू शकता. परंतु जास्त वेळ कुकरचे झाकण उघडणे टाळा. जास्तवेळ कुकरचे झाकण उघडल्यास आपला केक व्यवस्थित फुलून येणार नाही. 

५. मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनची गरज नाही :-  केक करण्यासाठी घरात मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असलाच पाहिजे असे नाही. कुकर किंवा कढईमध्ये  केक करता येतो. कुकर/ कढईच्या तळाला वाळू किंवा बारीक मीठ पसरावे व त्यावर गोल स्टील रींग किंवा टेबलवर गरम भांडी ठेवण्यासाठीचे स्टँड ठेवावे व त्यावर केक टिन ठेवावे. कढईवर मापाचे जड झाकण ठेवावे.जर कुकर असेल तर शिट्टी काढावी व ओव्हनप्रमाणे १० मिनिट प्री - हिट करून घ्यावे.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स