Join us  

आता प्रेशरकुकरमध्ये ५ मिनिटांत करा हॉटेलसारखा परफेक्ट जिरा राईस, रेसिपी अशी की जिरा राईस बिघडणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 3:35 PM

Pressure Cooker Jeera Rice within 10 min : प्रेशर कुकरमध्ये तयार करा मोकळा, परफेक्ट हॉटेलस्टाईल जीरा राईज, घ्या सोपी कृती

सणवार आल्यानंतर प्रत्येक घरात स्पेशल पदार्थ केले जातात. आता दसरा (Dasara) या सणाला काही दिवस उरले आहेत. या दिवशी संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते. दसऱ्याला बहुतांश लोकं पुरी-भाजी, पुरी-श्रीखंड, जीरा राईस-डाळ तडका, भजी यासह इतर काही विशिष्ट पदार्थ तयार करतात. अनेकांना ग्रेव्ही, भाजी किवा डाळ तडकासोबत जीरा राईस खायला आवडते.

पण घरी तयार केल्यास जीरा राईस हॉटेलसारखा मोकळा तयार होत नाही. अनेकदा जीरा राईस (Jeera rice) करण्याचं गणित चुकतं, किंवा राईस जास्त शिजला जातो. जर आपल्याला हॉटेलस्टाईल जीरा राईस तयार करायचं असेल तर, प्रेशर कुकरमध्ये करून पाहा. स्टेप बाय स्टेप या रेसिपीला फॉलो केल्याने जीरा राईस परफेक्ट, मोकळा तयार होईल(Pressure Cooker Jeera Rice within 10 min).

जीरा राईस करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

पाणी

तमालपत्र

कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य

लवंग

जिरं

मीठ

लिंबू

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप बासमती किंवा इतर कोणत्याही प्रकारचे तांदूळ घ्या, त्यात २ कप पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या, व तांदूळ १० मिनिटांसाठी भिजत ठेवा. गॅसवर प्रेशर कुकर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात २ ते ३ तमालपत्राची पानं, ४ ते ५ लवंग, एक चमचा जिरं घालून भाजून घ्या. खडा मसाला भाजून झाल्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून भाजून घ्या.

तूप करण्यासाठी साय साठवता? पण त्यातून दुर्गंधी येते, बुरशी लागते? ५ टिप्स, साय टिकेल महिनाभर

तांदूळ भाजून झाल्यानंतर त्यात ३ कप पाणी, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा एक छोटा तुकडा घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यावर कुकरचं झाकण लावून बंद करा. कुकरला एक शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा, व १५ मिनिटानंतर प्रेशर कुकरचं झाकण उघडून जीरा राईस सर्व्ह करा. अशा प्रकारे जीरा राईस खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सदसरा