Join us  

करा प्रेशर कुकरमध्ये पावभाजी, फक्त १ शिट्टी आणि हॉटेलस्टाइल परफेक्ट पावभाजी झटपट तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 12:21 PM

Pressure cooker pav bhaji recipe - instant, no artificial colour : पावभाजी करायची म्हणजे मोठा तामताझ करायला पाहिजे असं नाही, उलट पावभाजी झटपटच चांगली होते.

लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा पदार्थ म्हणजे पावभाजी (Pav bhaji recipe in Marathi). चमचमीत लागणारी ही डिश प्रत्येक जण आवडीने खातो. बरेच जण विकेंडला काहीतरी हटके खाण्याच्या इच्छेने घरात पावभाजी तयार करतात. आता काही दिवसात हे वर्ष सरून, नवीन वर्षाचं आगमन होईल. सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येक जण घरात नवीन पदार्थ करून पाहतो. शिवाय चमचमीत पदार्थ खाऊन आनंद व्यक्त करतो. काही जण हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करतात, तर काही घरातचं नवनवीन पदार्थ तयार करून न्यू पार्टी एन्जॉय करतात.

जर आपणही न्यू इअर पार्टीनिमित्त (New Year Party) पाव भाजीचा बेत आखणार आहात तर, ही कुकर पावभाजी रेसिपी ट्राय करून पाहा. अनेकदा घरात मनासारखी हॉटेलस्टाईल पाव भाजी तयार होत नाही (Cooking Tips). जर आपल्याला हॉटेलस्टाईल चवीची घरात पावभाजी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्कीच करून पाहा(Pressure cooker pav bhaji recipe - instant, no artificial colour).

हॉटेलस्टाईल कुकर पावभाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटा

गाजर

मटार

तेल

बटर

जिरं

हिंग

हळद

कांदा

सिमला मिरची

मीठ

लाल तिखट

धणे पूड

गुलाबी थंडीत लाल रसाळ टोमॅटोचे करा चटकदार सूप, इन्स्टंट सूपपेक्षा घरगुती सूप आरोग्यासाठी बेस्ट

पावभाजी मसाला

टोमॅटो प्युरी

आलं-लसूण पेस्ट

लिंबाचा रस

कोथिंबीर

गरम मसाला

कृती

सर्वप्रथम, प्रेशर कुकरमध्ये बारीक चिरलेला बटाटा, गाजर, मटार, चवीनुसार मीठ, एक चमचा पावभाजी मसाला, एक चमचा तेल आणि पाणी घालून प्रेशर कुकरचं झाकण बंद करा. एक शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा. नंतर पावभाजी मॅशरने भाज्या मॅश करून घ्या.

२ कांदे चिरा आणि बनवा झटपट दही प्याज, अफलातून रेसिपी करायला सोपी

दुसरीकडे कढईत एक चमचा बटर, एक चमचा तेल घाला. बटर विरघळल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग आणि हळद घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यात ४ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेली सिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून परतवून घ्या. नंतर त्यात दोन चमचे काश्मिरी लाल तिखट, अर्धा चमचा धणे पूड, दोन चमचे पावभाजी मसाला, एक कप टोमॅटो प्युरी घालून परतवून घ्या.

५ मिनिटानंतर त्यात एक चमचा आलं-लसूण पेस्ट आणि मॅश करुन घेतलेली भाजी घालून चमच्याने मसाल्यात एकजीव करा. नंतर त्यात एक ग्लास पाणी घालून त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. शेवटी एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून पावसोबत डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे पावभाजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :नववर्षअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स