Lokmat Sakhi >Food > कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी

कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी

Pressure cooker pav bhaji recipe - with full video : फक्त १ शिट्टी आणि हॉटेलस्टाइल परफेक्ट पावभाजी रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2024 01:15 PM2024-11-08T13:15:45+5:302024-11-08T15:26:20+5:30

Pressure cooker pav bhaji recipe - with full video : फक्त १ शिट्टी आणि हॉटेलस्टाइल परफेक्ट पावभाजी रेडी

Pressure cooker pav bhaji recipe - with full video | कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी

कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी

लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा पदार्थ म्हणजे पावभाजी (Pav Bhaji). चमचमीत लागणारी ही डिश प्रत्येकाला आवडते (Food). बरेच जणांना विकेंड जवळ आल्यानंतर काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा होते (Cooking Tips). अशावेळी आपण घरात झटपट पावभाजीचा बेत आखू शकता. पावभाजी करायला अनेकांना अवघड वाटतं. भाज्या कमी जास्त प्रमाणात शिजतात. शिवाय मसाला योग्य प्रमाणात एकजीव होत  नाही. ज्यामुळे पाव भाजीची चव बिघडते.

जर आपल्याला परफेक्ट हॉटेलस्टाईल पद्धतीची पावभाजी करायची असेल तर, या रेसिपीला नक्कीच फॉलो करून पाहा. अगदी कमी वेळात प्रेशर कुकरमध्ये झटपट पावभाजी तयार होईल. प्रेशर कुकरमध्ये चमचमीत पावभाजी कशी करायची? पाहा(Pressure cooker pav bhaji recipe - with full video).

चमचमीत पावभाजी करण्यासाठी लागणारं साहित्य


तेल

बटर

जिरं

लसूण

हिरवी मिरची

कांदा

सिमला मिरची

टोमॅटो

मटार

फरसबी

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

फ्लॉवर

गाजर

बटाटे

हळद

मीठ

लाल तिखट

पाव भाजी मसाला

कृती

सर्वात आधी प्रेशर कुकरमध्ये २ चमचे तेल घाला. नंतर त्यात १ क्यूब बटर घाला. बटर वितळल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो घालून भाजून घ्या. नंतर त्यात एक वाटी मटार, फरसबी, फ्लॉवर, गाजर, बटाटे घालून भाजून घ्या.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

नंतर त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, २ चमचे पावभाजी मसाला घालून मिक्स करा. नंतर त्यात २ ग्लास पाणी घाला. प्रेशर कुकरचं झाकण लावा. आणि ४ शिट्ट्यानंतर गॅसची फ्लेम लो करा. नंतर पावभाजी मॅशरने भाजी मॅश करून घ्या.

आता फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, २ चमचे पाव भाजी मसाला घालून फोडणी भाजीमध्ये मिक्स करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. 

Web Title: Pressure cooker pav bhaji recipe - with full video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.