Lokmat Sakhi >Food > कुकरमधून डाळ बाहेर येते, रबर सैल होते? ५ टिप्स, शिट्ट्या होतील नीट- डाळ फसफसणार नाही

कुकरमधून डाळ बाहेर येते, रबर सैल होते? ५ टिप्स, शिट्ट्या होतील नीट- डाळ फसफसणार नाही

Pressure Cooker Tips and Hacks : कुकर खराब झाल्यास काही सोपे घरगुती हॅक्स वापरून तुम्ही चवदार, चविष्ट स्वयंपाक बनवू शकता. (Brilliant Kitchen Hacks That you Must Try)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 11:56 AM2023-05-02T11:56:01+5:302023-05-03T09:28:20+5:30

Pressure Cooker Tips and Hacks : कुकर खराब झाल्यास काही सोपे घरगुती हॅक्स वापरून तुम्ही चवदार, चविष्ट स्वयंपाक बनवू शकता. (Brilliant Kitchen Hacks That you Must Try)

Pressure Cooker Tips and Hacks : 5 Best Cooking Hacks to Save Time and Money | कुकरमधून डाळ बाहेर येते, रबर सैल होते? ५ टिप्स, शिट्ट्या होतील नीट- डाळ फसफसणार नाही

कुकरमधून डाळ बाहेर येते, रबर सैल होते? ५ टिप्स, शिट्ट्या होतील नीट- डाळ फसफसणार नाही

स्वयंपाकाचं काम सोपं करण्यासाठी कुकरची खूप मदत होते. कुकरमध्ये काहीही बनवताना गॅस आणि वेळेचीही बचत होते. कुकरमध्ये तुम्ही भाजी, खिचडी, गोड पदार्थ, डाळ-भात असे विविध रोजच्या जेवणासाठी लागणारे पदार्थ अगदी काही वेळात बनवू शकता. (Pressure Cooker Tips and Hacks) पण कुकरचा वापर करत असताना अनेकदा कुकरमधून पाणी बाहेर येणं, व्यवस्थित प्रेशर नसणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो.  कुकर खराब झाल्यास ऐनवेळी काय करावं सुचत नाही.  सोपे घरगुती हॅक्स वापरून तुम्ही चवदार, चविष्ट स्वयंपाक कुकरमध्ये बनवू शकता. (Brilliant Kitchen Hacks That you Must Try)

१) कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येणं

अनेकदा असं दिसून येतं की जेवण करताना कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येतं. डाळ, भात बनवताना अशी समस्या येते. हे टाळण्यासाठी तुम्ही एक चमचा तेल किंवा तूप डाळ आणि भातात मिसळा. याशिवाय डाळ, बीन्स, शेंगा किंवा भात शिजवताना प्रेशर कुकरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरू नका.

2) योग्य प्रमाणात प्रेशर न येणं

जर तुमचा कुकर खूपच नवीन असेल आणि त्यात व्यवस्थित प्रेशर येत नसेल तर कुकरचं झाकण तपासून पाहा. कुकरचं झाकण व्यवस्थित बंद नसेल तर पुन्हा एकदा तपासून पाहा. प्रेशर कुकरचा वापर तुम्ही ३ वेळा जास्त वेळा करत असाल तर गॅसकेट बदला. जर सर्वकाही व्यवस्थित वाटत असेल तर जेवण बनवताना पाण्याचे प्रमाण तपासा. पाणी कमी जास्त नसेल याची खात्री करा.

भाताबरोबर खायला १० मिनिटात करा चविष्ट वाटपाचे वरण; १ वाटी तूर डाळीत करा अप्रतिम पदार्थ

3) वाफ ब्लॉक होणं

जेव्हा तुम्ही कुकरमध्ये काहीही बनवता तेव्हा वाफेमुळे झाकण घट्ट लागू शकतं. काही खाद्यपदार्थ स्टिम वेंट ब्लॉक करतात जसं की पास्ता, तांदूळ आणि इतर काही पदार्थ हे पदार्थ वाफेसह वर येतात वाफ बाहेर येणं रोखतात हे अनेकदा धोकादायक ठरू शकतं.

4) हँण्डलमधून वाफ आणि पाणी बाहेर येणं

प्रेशर कुकरचे हॅण्डल्स अशाप्रकारे डिजाईन केलेले असतात की ते जास्त गरम होणार नाही आणि वाफ ब्लॉक करणार नाहीत. हॅण्डलमुळे वाफ आणि इतर पातळ पदार्थ  बाहेर निघत असतील तर कुकरचे एकापेक्षा जास्त भाग खराब झालेले असू शकतात. जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा कुकरच्या  झाकणातून अन्न बाहेर येतं, असे होत असल्यास कुकर अर्ध्यापेक्षा जास्त भरू नका.

5) प्रेशर कुकरचं रबर सैल असणं

प्रेशर कुकरचं रबर सैल झालं असेल तर थंड पाणी, गव्हाचं पीठ किंवा टेपचा वापर करून तुम्ही  हे रबर पुन्हा घट्ट करू शकता. यामुळे रबरमधून हवा बाहेर येणार नाही.

Web Title: Pressure Cooker Tips and Hacks : 5 Best Cooking Hacks to Save Time and Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.