Lokmat Sakhi >Food > प्रत्येकाला माहितीच असायला हवेत असे कुकर वापरण्याचे ५ हॅक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

प्रत्येकाला माहितीच असायला हवेत असे कुकर वापरण्याचे ५ हॅक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

Pressure Cooker Tips And Hacks : जेव्हा रोजच्या वापरातील कुकर व्यवस्थित चालत नाही तेव्हा तुमचं काम वाढू शकतं. कुकरला मेंटेनसची आवश्यकता असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:19 PM2024-03-19T13:19:45+5:302024-03-19T14:57:28+5:30

Pressure Cooker Tips And Hacks : जेव्हा रोजच्या वापरातील कुकर व्यवस्थित चालत नाही तेव्हा तुमचं काम वाढू शकतं. कुकरला मेंटेनसची आवश्यकता असते.

Pressure Cooker Tips And Hacks : 5 Tips For Using a Pressure Cooker | प्रत्येकाला माहितीच असायला हवेत असे कुकर वापरण्याचे ५ हॅक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

प्रत्येकाला माहितीच असायला हवेत असे कुकर वापरण्याचे ५ हॅक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

रोजच्या इतर कामाच्या गडबडीत स्वंयपाक करणं हे खूपच कठीण काम वाटतं. (Kitchen Hacks) कमीत कमी वेळेत स्वंयपाक व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वेळ आणि गॅसची बचत होण्यासाठी अनेकजण आपल्या स्वंयपाकघरात कुकरचा वापर करतात. (Pressure Cooker Tips And Hacks) जेव्हा रोजच्या वापरातील कुकर व्यवस्थित चालत नाही तेव्हा तुमचं काम वाढू शकतं. कुकरला मेंटेनसची आवश्यकता असते.

कुकरला वरण भात लावल्यानंतर शिट्टीच येत नाही किंवा अतिरिक्त पाणी बाहेर येतं अशी तक्रार अनेकांची असते. (Tips For Using a Pressure Cooker) ज्यामुळे किचन घाणेरडं दिसून लागतं आणि अन्न कच्च राहतं. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करायला हवेत. (How to Fix Pressure Cooker Problem's)

कुकरच्या  झाकणातून वाफ बाहेर येत असेल तर काय करावे?

असं अनेकदा होतं की कुकरच्या  झाकणातून वाफ बाहेर येऊ लागते. ज्यामुळे शिट्टीसुद्धा येत नाही. रबर लूज असल्यामुळे हे होऊ शकते. यासाठी  झाकण आणि रबराचे लिड काढून एकदा थंड पाण्यात ठेवा. त्यानंतर पुन्हा यूज करा. कुकरच्या झाकणाच्या ज्या भागातून वाफ बाहेर येत आहे. त्या ठिकाणी  थोडं पीठ लावा.  या उपायांनी कुकर आपोआप चांगला होईल आणि शिट्टी निघेल.

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी

कुकरमधून प्रेशर येत नसल्यास काय करावे?

कुकरमधून व्यवस्थित प्रेशर येत नसेल तर अन्न कच्च राहू शकतं किंवा जळण्याचा वासही येऊ शकतो. असं सतत होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा रबर व्यवस्थित काढून चेक करून घ्या. त्यात कोणतंही कट नसेल ते लूज नसेल याची खात्री करून घ्या.

कुकरमधून पाणी बाहेर आल्यानंतर काय करावे?

कुकरमधून वारंवार पाणी येत असेल तर पूर्ण किचन घाणेरडे होऊ शकते. यासाठी तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही. जेव्हा कुकरला काही चिटकत असेल तर त्यात १ चमचा तूप किंवा कुकींग ऑईल घाला.  ज्यामुळे पाणी बाहेर येणार नाही ज्यामुळे किचन खराब होणार नाही.

केस खूपच पातळ झालेत? दाट-लांब केसांसाठी खा 'हे' ५ आंबट पदार्थ, पटापट वाढतील केस

शिट्ट्या होत नसतील तर काय करावे

कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होत नसतील तर झाकणाच्यावर एक छिद्र असते. त्यातून हवा बाहेर येते ते तपासून पाहा. जर त्यात काही अडकले असेल तर शिट्टी होणार नाही. याव्यतिरिक्त  योग्य आचेवर न ठेवल्यामुळे शिट्ट्या उशीरा होतात. प्रेशर कुकर शिट्टीवर लावण्याआधी उच्च आचेवर ठेवा. 

कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल

कुकरचा वापर करून चांदीची भांडी चकमकवू शकता

कुकरमध्ये पाणी भरा. त्यात एल्यूमिनियम फॉईल, १ चमचा बेकिंग सोडा घालून १ शिट्टी काढून घ्या. नंतर  ही भांडी पॉलिश करून घ्या. त्यामुले भांडी चमकवण्यास मदत होईल.

कुकरमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात चहा बनवू शकता.

एका प्रेशर कुकरमध्ये २ कप दूध,  चहा पावडर, आलं आणि गरजेनुसार पाणी, साखर, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी घाला. उच्च आचेवर १ शिट्टी काढून घ्या. तयार होईल गरमागरम चहा.

Web Title: Pressure Cooker Tips And Hacks : 5 Tips For Using a Pressure Cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.