'दही' हा भारतीय थाळी मधील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. ताटांत कितीही पंच पक्वान्न वाढली तरीही दही, ताक याचे स्थान हे कायम असतेच. आपण जसे जेवणाच्या थाळीत आवर्जून दही वाढतो तसेच काही खास पदार्थ बनवताना आपण त्यात दही घालतो. जेवणात दह्याचा वापर केल्यास अन्नाची चव वाढते. त्याचबरोबर आपल्या शरीरास आवश्यक असलेली अनेक पोषक द्रव्ये देखील मिळतात. दह्यात कमालीचा थंडावा असून, पोट स्वच्छ करण्याची क्षमता त्यात असते. दह्याचे हे गुणधर्म असल्यामुळे भारताच्या उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत प्रत्येक थाळीत दह्याने बनवलेला एक तरी पदार्थ असतोच.
दह्याचा आपल्या रोजच्या जेवणात वापर केल्याने त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. इतके बहुगुणी दही खाणे गरजेचे असते. रस्सेदार आणि ग्रेव्हीच्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण त्यात दह्याचा वापर करतो. दह्याचा वापर केल्याने या रस्सेदार भाज्या अधिक घट्ट आणि टेस्टी होतात. परंतु या रस्सेदार भाज्यांमध्ये दही घालताना काहीवेळा हे दही फुटते आणि आपल्या सगळ्या ग्रेव्हीची टेस्ट बिघडते. कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही घालताना खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर ऐनवेळी दही फुटून तिची चव बिघडते व सगळा हिरमोड होतो. ग्रेव्हीची भाजी बनवताना काहीवेळा दही फुटते आणि खराब होते, या समस्येचा अनुभव प्रत्येक गृहिणीला कधीनाकधी आलाच असेल. ग्रेव्हीत दही घातल्यानंतर ते फुटल्यावर ग्रेव्हीची चव बिघडून ती वाया जाऊ नये म्हणून काही सोप्या टिप्सचा वापर आपण करू शकतो(Prevent curd from curdling when adding to gravies with these 3 hacks).
ग्रेव्हीत दही घालतांना ते फुटू नये म्हणून...
घरांत काही खास फंक्शन किंवा सण असेल तर आपण ग्रेव्ही किंवा रस्सेदार भाज्यांचा बेत आखतो. या भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण त्यात दही घालून त्यांची लज्जत आणखीन वाढवतो. पण कधी कधी ग्रेव्हीमध्ये दही घालताना ते दही फुटून ग्रेव्ही खराब होते. अशावेळी या सोप्या टीप्सचा वापर करून दही फुटण्यापासून वाचवू शकता. भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर ते फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम पेजवरून काही सोप्या टीप्स शेअर केल्या आहेत.
टीप १ :- भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही घालणार असाल तर ते दही आधी चांगले फेटून घ्या. दही चांगले फेटून घेतल्यावर ग्रेव्हीमध्ये घातल्यास दही फुटत नाही.
फक्त १० मिनिटांत फ्रिजमध्ये करून ठेवा ४ प्रकारची वाटणं, रोजचा स्वयंपाक होईल चमचमीत - झटपट...
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
टीप २ :- ग्रेव्हीमध्ये दही घालताना आपला गॅस पूर्ण बंद किंवा मंद आचेवर ठेवावा. दही घालताना गॅस मोठ्या आचेवर ठेवणे टाळा. जेव्हा आपण कोणत्याही ग्रेव्हीमध्ये दही घालत असताना ग्रेव्ही उकळी फुटलेल्या स्थितीत नसावी. अशा स्थितीत ग्रेव्ही मध्ये दही घातल्यास ते फुटते. म्हणून गॅस मंद आचेवर ठेवून ग्रेव्हीला देखील उकळी फुटलेली नसावी अशावेळी ग्रेव्हीत दही घालावे.
घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...
रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...
टीप ३ :- ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर, दही ग्रेव्हीमध्ये एकजीव होईपर्यंत ग्रेव्ही चमच्याच्या मदतीने ढवळत राहावी. ग्रेव्हीमध्ये दही संपूर्णपणे मिक्स होईपर्यंत चमच्याने हलवत राहावे.
या सोप्या ३ टीप्स फॉलो करून आपण ग्रेव्हीत घातलेल दही फुटण्यापासून वाचवू शकतो.