आंब्याला फळांचा राजा मानले जाते. या फळांच्या राजाची येण्याची आपण वर्षभर वाट बघत असतो. आंब्याचा सिजन सुरु झाला की आपण सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आंबा खाणे पसंत करतो. आंब्याचा गोड स्वाद, केशरी अस्सल रंग, चव यामुळे आपल्याला आंबा खावासा वाटतो. आपल्यापैकी प्रत्येकाचा आंबा हा विक पॉईंट असतो. कधी एकदा आंबा बाजारात विकायला येतो आणि आपण तो घरी आणून खातो असे अनेकांना होते. वर्षातून अवघा २ महिने येणारा हा आंबा मनसोक्त खाऊन घेतला तर वर्षभरासाठी तब्येत चांगली राहते असे म्हणतात. आंब्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशी खनिजं आणि जीवनसत्त्व असल्याने हे फळ खाल्लेले चांगले.
समोर ठेवलेल्या आंब्याच्या पेटीतील आंबा कधी एकदा कापून खातो असे आपल्याला होते. आंबा आपण एकतर कापून फोडी करुन खातो, त्याचा आमरस करुन तो पोळी किंवा पुरीसोबत खातो. नाहीतर आंब्याचे पुडींग, मिल्क शेक, शिरा, जेली, केक, आईस्क्रीम असे काही ना काही पदार्थ करुन खातो. आंबा खाताना त्याच्या छोट्या छोट्या फोडी कापून खाण्याला आपल्याकडे जास्त पसंती दिली जाते. परंतु आंब्याच्या फोडी कापून थोड्या वेळासाठी अशाच ठेवल्या तरीही त्या लगेच काळ्या पडतात. केळी, सफरचंद, आंबा इत्यादी काही फळे कापल्यानंतर लगेच काळी पडतात. हे घडते कारण जेव्हा फळ हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होऊन ते काळे पडतात. ही फळे कापल्यानंतर एन्झाइम्स बाहेर पडतात. या ऑक्सिडेशनमुळे फळे काळी पडतात. आंबा हे अशा फळांपैकी एक आहे जे कापून २ ते ५ मिनिटे ठेवल्यास ते लवकर काळे पडतात. अशी काळी पडलेली आंब्याची फोड खायला कोणालाच आवडत नाही. आंब्याच्या फोडीचा अस्सल केशरी नैसर्गिक रंग पाहून ते खाण्याची इच्छा होते. आंब्याची फोड कापल्यानंतर लगेच काळी पडू नये यासाठी काही सोपे उपाय(Prevent mangoes from turning black after cutting – 4 ways to keep the fruit fresh).
आंब्याची फोड कापल्यानंतर तो काळी पडू नये म्हणून नेमकं काय कराव ?
१. साखरेच्या किंवा मधाच्या पाण्याचा वापर :- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मध मिसळून घ्यावे. मध संपूर्णपणे पाण्यांत विरघळेपर्यंत पाणी ढवळून घ्यावे. आता आंब्याच्या कापलेल्या फोडी या मिश्रणात बुडवून ठेवाव्यात. जर आपल्याला मध आवडत नसेल तर आपण मधा ऐवजी साखरेचा देखील वापर करु शकतो. मधामध्ये असणारे पेप्टाइड कंपाऊंड पॉलीफेनॉल ऑक्सिडेस एन्झाइमला फिनोलिक संयुगे गडद रंगद्रव्यांमध्ये रूपांतरित करण्यापासून प्रतिबंधित करते, यामुळे आंब्याच्या फोडींचा रंग बदलून काळा होत नाही.
आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...
२. आंब्याचे तुकडे डिप फ्रिजरमध्ये ठेवा :- आंबे धुवून कापून घ्या आणि झिपलॉक बॅगेमध्ये भरून घ्या. ही पिशवी डिप फ्रिजरमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या गोठवलेल्या आंब्याचा आनंद आपण घेऊ शकता. गोठवल्याने फळ खराब होण्याची क्षमता कमी होते. फळ डिप फ्रिज करून ठेवल्याने फळांमधील सूक्ष्म जीवांची वाढ रोखण्याचे काम केले जाते.
प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...
३. आंब्याच्या फोडी लिंबाच्या रसात भिजवा :- आंब्याच्या तुकड्यांना लिंबू पाण्यात भिजवा. याशिवाय आंब्याच्या फोडी कापून त्याच भांड्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते आणि आंबा काळा होत नाही.
आंबा आणि साखर, दोनच गोष्टी वापरून करा परफेक्ट आंब्याचा जॅम, वर्षभर टिकेल...
४. आंब्यांच्या फोडींना फूड रॅपने गुंडाळा :- आंबा कापून त्याच्या फोडी करुन घ्याव्यात, या फोडी एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून दयाव्यात. आता त्या प्लेटला फूड रॅपने गुंडाळा. अशाप्रकारे आंबा साठवून ठेवल्यास काळा होणार नाही, कारण तो एंजाइम सोडून हवेशी प्रक्रिया करु शकणार नाही. अशाप्रकारे ऑक्सिडेशन थांबेल आणि आंब्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत.