Join us  

Printed Samosa : हा असला कसला समोसा! मार्केटमध्ये प्रिंटेड समोशाची क्रेझ, या कोड वर्डचा नेमका अर्थ आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 10:42 AM

Printed Samosa : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बकलीवाल नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

समोसा सगळ्यांनाच खायला आवडतो. नाव घेतलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेक शहरांमध्ये लोक सकाळी सुरूवात चहा, सामोश्यांनी करतात. बटाटा वाटाण्याचं सारण घातलेला सामोसा पाहताच क्षणी खाण्याची इच्छा होते. आजकाल पनीर, मॅकरोनी, नुडल्स, कॉर्न, चीझ आणि वेगवेगळे मसाले घातलेले सामोसे बाजारात मिळतात. सोशल मीडियावर बंगळुरूच्या एका व्यक्तीनं सामोश्याचे टेक इनोवेशन शेअर केले आहे. जे खुपच युनिक आहे. (Printed samosa in  bengalore printed samosa photo viral on social media)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बकलीवाल नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यात बटाटा आणि नुडल्स अशी प्रिंट दिसत आहे.  खरं तर लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे समोसे खायला खूप आवडतात  जेणेकरून फ्लेवर्स कळायला मदत होईल. म्हणूनच समोश्यांवर प्रिंट करण्यात आलं आहे.  या ट्विटला आत्तापर्यंत 2,590 लोकांनी लाईक केले असून, हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.

त्याचबरोबर यावर लाइक्स, रिट्विट्स आणि कमेंट्सचा पाऊसही पडत आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मी काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील एका छोट्या शहरात हे पाहिले आहे. त्यांचे सामोश्याचे स्टार्टअप शॉप होते जिथे ते विविध प्रकारचे समोसे देतात. आणखी एका व्यक्तीने लिहिले की, 'तंत्रज्ञानाने आपल्याला अधिक आळशी बनवले आहे.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.