भारतीय जेवणाची थाळी ही लोणच्याशिवाय अपूर्णच आहे. भारतीय जेवणाच्या थाळीत लोणचं वाढल्याशिवाय त्या जेवणाच्या थाळीला पूर्णत्व येत नाहीच. लोणचं, पापड असं काहीतरी तोंडी लावण्यासाठी असल्याशिवाय साग्रसंगित भोजनाची मजाच येत नाही. काहीवेळा जेवणात काही आवडीचे पदार्थ किंवा भाजी नसली की, लोणच्याच्या छोट्याशा फोडीसोबतही जेवण करता येत. चटकदार, चमचमीत, झणझणीत लोणचं खायला कोणाला आवडणार नाही. लोणच्याचा स्वाद एकदम चटपटीत असतो आणि रोजच्या जेवणाची चव देखील झटक्यात वाढवतो. लोणच्यामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो ज्यामुळे लोणच्याची चव अधिक चविष्ट लागते.
उन्हाळा म्हटलं की भारतीय लोकांमध्ये लोणची, पापड वर्षभरासाठी बनवून ठेवण्याची सवय असते. उन्हाळ्यात आपल्याकडे असंख्य प्रकारची लोणची, चटण्या, पापड, कुरडया अशी वाळवण घातली जातात. या वाळवणांपैकी लोणचं हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. या घरगुती लोणच्याची चव इतकी प्रसिद्ध आहे की बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला देखील या भारतीय लोणच्याची भुरळ पडली आहे. लोणच्यांमध्ये भरपूर तेल, मसाले असतात त्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोक ते खाण्यासाठी नाक मुरडतात, परंतु बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तितक्याच आवडीने भारतीय लोणचे खाताना दिसून येते. प्रियंका चोप्राने अलीकडेच ग्राझिया मासिकाला दिलेल्या मुलाखतीत १० हटके प्रश्नांची उत्तरे दिली आणि तिच्या विचित्र खाद्य सवयीबद्दल चर्चा केली. प्रियांकाची ही विचित्र सवय काय असू शकते ते पाहुयात(Priyanka Chopra Reveals Her Obsession With This Indian Food).
प्रियांका चोप्राला प्रत्येक पदार्थांसोबत तोंडी लावायला म्हणून लोणचं खायला आवडते...
ग्राझिया यूकेच्या (Grazia UK) व्हिडिओ मुलाखतीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राला तिच्या आहाराविषयीच्या सर्वात विचित्र कॉम्बिनेशन बद्दल विचारले असता, तिने एकदम हटके उत्तर दिले आहे. या व्हिडीओमध्ये, सुंदर लाल पोशाख घातलेली, प्रियंका स्पष्टपणे उत्तर देते की ती कोणत्याही गोष्टीत मला लोणचं घालून खायला फारच आवडते. पुढे भारतीय लोणच्याविषयी बोलताना प्रियांका म्हणते, भारतीय लोणचे हा असा पदार्थ आहे की जो अगदी कशापासूनही सहज बनवता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे, यांसोबतच शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे लोणचे बनवता येते.
खमंग मसालेदार ‘कांद्याचा पराठा, आलू पराठ्यासारखाच चविष्ट ‘प्याज पराठा’ खाऊन तर पाहा...
रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...
लोणचे खाण्याची प्रियांकाची विचित्र सवय...
या मुलाखती दरम्यान प्रियांका चोप्रा लोणच्याविषयी सांगताना म्हणते की, शक्यतो लोणचे हे एकदम चटपटीत, मसालेदार असते. प्रियांकाला भारतीय पदार्थांसोबतच इतर वेस्टर्न पदार्थांबरोबर किंवा अगदी जंक फुडसोबत देखील लोणचे खायला आवडते. प्रियांका चक्क पिझ्झा, सँडविच यांसारख्या पदार्थांसोबत देखील लोणचे आवडीने खात असल्याचे सांगते. प्रियांका एवढेच करून थांबत नाही तर, भारतीय चायनीज पदार्थांसोबत ती तितक्याच आवडीने लोणचं खाते. प्रत्येक गोष्टीवर लोणचं घालून खाणे ही माझी विचित्र सवय आहे, हे मला माहित आहे.