बाजारातून फळं, भाज्या आणल्या की त्या स्वच्छ धुवायच्या आणि मगच खायच्या, हे आपल्याला माहितीच असतं. आपण तसं करतोही. पण बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीने भाज्या किंवा फळं धुतो ती पद्धत सगळ्याच फळांसाठी किंवा भाज्यांसाठी लागू होणारी नसते. उदाहरणार्थ जेव्हा आपण द्राक्षं विकत आणतो तेव्हा ती नुसती पाण्याखाली धरून स्वच्छ होत नाहीत. ती योग्य पद्धतीने स्वच्छ व्हावी यासाठी ती १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावी, नंतरच पुसून- व्यवस्थित कोरडी करून खावी असा सल्ला दिला जातो. तशीच स्ट्रॉबेरी धुण्याची (Proper method of cleaning strawberry) पद्धतही थोडी वेगळी आहे.
हल्ली कोणतीही फळं पिकविण्यासाठी त्यावर खूप जास्त प्रमाणात किटक नाशकांचा, वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरीही त्याला अपवाद नाही.
मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ५ साध्या- सोप्या गोष्टी, करून बघा- मुले होतील तल्लख
स्ट्रॉबेरीला जी बाहेरून लहान- लहान छिद्रे दिसतात, त्यात बऱ्याचदा छोटे- छोटे किडे असतात. जर स्ट्रॉबेरी नुसतीच वरवर धुतली तर ते किडे निघत नाहीत. त्यामुळे स्ट्रॉबेरी कशा पद्धतीने स्वच्छ करावी, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ goblet_honey या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
स्ट्रॉबेरी कशा पद्धतीने धुवावी?
१. या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी धुण्यासाठी आपल्याला मीठ आणि पाणी या दोन गोष्टी लागणार आहेत.
२. सगळ्यात आधी तर बाजारातून आणलेल्या स्ट्रॉबेरी एका भांड्यामध्ये काढून घ्या.
फिटनेससाठी नुसतंच वॉकिंग नको, 'रेट्रो' वॉकिंग करा, कसं करायचं- काय फायदे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
३. त्यात एक टेबलस्पून मीठ टाका आणि स्ट्रॉबेरी पुर्णपणे बुडतील एवढं पाणी टाका. १० ते १५ मिनिटे स्ट्रॉबेरी पाण्यात तशाच राहू द्या. त्यात जर काही किडे असतील तर ते मीठामुळे बाहेर येतील. प्रत्येकवेळी अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी धुतल्यावर किडे दिसतीलच असे नाही. कारण काही स्ट्रॉबेरीमध्ये किडे नसूही शकतात.
४. त्यानंतर त्या पाण्यातून बाहेर काढा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.