Join us  

साखर-तूप-गुळ न घालता करा प्रोटीन लाडू, केस गळणे-थकवा-स्किन प्रॉब्लम्स होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 1:08 PM

Protein Bites Recipe | No Bake Healthy Energy Balls एक लहानसा लाडू रोज खा आणि शरीराला द्या नवीन प्रोटीनफूल एनर्जी

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीराला पुरेसे पौष्टीक घटक मिळत नाही. ज्यामुळे लठ्ठपणा, केस गळणे, हृदयाच्या निगडीत समस्या, स्किन प्रॉब्लेम्स, मधुमेह या गंभीर समस्या शरीराला घेराव घालतात. शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळावी यासाठी प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. परंतु, प्रत्येक पदार्थातून आपल्याला प्रोटीन मिळलेलच असे नाही.

जर आपल्या शरीराला गंभीर आजारांपासून दूर, आणि दिवसभर काम करण्याची उर्जा मिळवायची असेल तर, प्रोटीन रिच लाडू खा. हे लाडू साखर, गुळ आणि तुपाशिवाय तयार होतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हे लाडू फायदेशीर ठरू शकते. चला तर मग प्रोटीन रिच लाडू कसे तयार करायचे हे पाहूयात(Protein Bites Recipe | No Bake Healthy Energy Balls).

प्रोटीन बाईट्स किंवा प्रोटीन लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

शेंगदाणे

पांढरे तीळ

अळशीच्या बिया

खजूर

वेलची पावडर

बदाम

पिस्ता

घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

सूर्यफुलाच्या बिया

भोपळ्याच्या बिया

चिया सीड्स

कृती

सर्वप्रथम, पॅननध्ये एक कप शेंगदाणे घालून भाजून घ्या, नंतर त्यात एक कप पांढरे तीळ, एक कप अळशीच्या बिया घालून मंद आचेवर भाजून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ठेवा. मिक्सरचं भांडं घ्या, त्यात भाजलेलं साहित्य घालून त्याची बारीक पावडर तयार करा. ही तयार पावडर मोठ्या बाऊलमध्ये काढून ठेवा.

आता मिक्सरच्या भांड्यात ३०० ग्रॅम बिया काढलेले खजूर घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. व ही तयार पेस्ट पावडरसोबत मिक्स करा. मिक्स करत असताना त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घाला. दुसरीकडे पॅनमध्ये एक कप कुटून घेतलेला बदाम, २ टेबलस्पून कुटून घेतलेला पिस्ता, २ टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया, २ टेबलस्पून भोपळ्याच्या बिया, २ टेबलस्पून चिया सीड्स घालून भाजून घ्या.

पापड कांद्याची चटणी - पावसाळ्यात त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर करा ही झटपट चमचमीत चटणी

साहित्य थंड झाल्यानंतर तयार मिश्रणात घालून मिक्स करा. साहित्य एकजीव झाल्यानंतर त्याचे छोटे - छोटे लाडू तयार करा. अशा प्रकारे प्रोटीन रिच लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू डब्यात स्टोर करून ठेऊ शकता.

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.