Lokmat Sakhi >Food > वेटलॉस करताय? भरपूर प्रोटीन्स देणारा गुलाबी बीटरुट डोसा खा- घ्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

वेटलॉस करताय? भरपूर प्रोटीन्स देणारा गुलाबी बीटरुट डोसा खा- घ्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Protein Fiber Rich Beetroot Dosa For Weight Loss: वेटलॉस करत असाल तर हा प्रोटीन रिच नाश्ता तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. शिवाय मुलांना डब्यात देण्यासाठीही बीटरुट डोसा चांगला आहे...(how to make beetroot dosa?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 04:28 PM2024-08-12T16:28:03+5:302024-08-12T16:28:43+5:30

Protein Fiber Rich Beetroot Dosa For Weight Loss: वेटलॉस करत असाल तर हा प्रोटीन रिच नाश्ता तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. शिवाय मुलांना डब्यात देण्यासाठीही बीटरुट डोसा चांगला आहे...(how to make beetroot dosa?)

protein fiber rich pink dosa, how to make beetroot dosa, beetroot dosa recipe for weight loss, perfect menu for kids tiffin and breakfast | वेटलॉस करताय? भरपूर प्रोटीन्स देणारा गुलाबी बीटरुट डोसा खा- घ्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

वेटलॉस करताय? भरपूर प्रोटीन्स देणारा गुलाबी बीटरुट डोसा खा- घ्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Highlightsसकाळच्या गडबडीत अगदी झटपट होणारा गुलाबी डोसा करण्याची रेसिपी

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात, ते कायम अशा पदार्थांच्या शोधात असतात की त्या पदार्थांमधून त्यांना भरपूर प्रोटीन तर मिळेलच पण पुढे अधिक वेळासाठी पोट चांगले भरल्यासारखे वाटेल. म्हणजेच त्यांना त्यांच्या आहारात प्रोटीन्स आणि फायबर हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात पाहिजे असतात. तुम्हीही अशा पदार्थांच्या शोधात असाल तर ही गुलाबी डोसा करण्याची रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण त्यातून तुम्हाला प्रोटीन्स आणि फायबर दोन्ही उत्तम प्रमाणात मिळतात (how to make beetroot dosa?). शिवाय लहान मुलांना डब्यात देण्यासाठीही हा नाश्ता एकदम उत्तम आहे (perfect menu for kids tiffin and breakfast). शिवाय सकाळच्या गडबडीत अगदी झटपट होणारा. बघा कसे करायचे गुलाबी रंगाचे बीटरुटचे वेटलॉस डोसे...(Protein Fiber Rich Beetroot Dosa For Weight Loss)

बीटरुट डोसा रेसिपी 

 

साहित्य

१ मध्यम आकाराचं बीटरुट

२ वाट्या भाजलेले ओट्स

अर्धी वाटी रवा

खिडकीला बसवलेली जाळी घाण साचून काळपट झाली? १ मस्त ट्रिक- काही मिनिटांतच जाळी चकाचक...

चवीनुसार मीठ

१ टीस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट

१ टीस्पून जिरेपूड

१ वाटी पनीरचे काप

१ वाटी तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या चिरून घेतलेल्या भाज्या

फोडणीसाठी तेल

 

कृती 

सगळ्यात आधी बीटरुट किसून घ्या. त्यानंतर ओट्स, रवा आणि बीटरुटचा किस मिक्सरच्या भांड्यात टाका आणि व्यवस्थत फिरवून त्याची प्युरी करून घ्या.

आता हे मिश्रण एका भांड्यात काढा. 

राखीपौर्णिमेसाठी साडी घ्यायची? फक्त ५०० रुपयांत घ्या बनारसी, कांजीवरम सेमीसिल्क साड्यांचे सुंदर प्रकार 

त्यामध्ये मीठ, जिरेपूड, आलं- लसूण- मिरची पेस्ट टाका आणि थोडं पाणी टाकून त्याचं पातळ मिश्रण बनवा.

दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल टाकून फोडणी करून घ्या. आता त्यामध्ये पनीर, भाज्या आणि त्यासोबत तुमच्या आवडीचे काही मसाले टाकून फ्राय करून घ्या. 

आता तवा ठेवून त्यावर बीटरुट डोसा करून घ्या. त्या डोस्यावर मधोमध आपण तयार केलेले पनीरचे स्टफिंग ठेवून डोसा फोल्ड करा. झाला तुमचा प्रोटीन रिच गुलाबी डोसा तयार... 

 

Web Title: protein fiber rich pink dosa, how to make beetroot dosa, beetroot dosa recipe for weight loss, perfect menu for kids tiffin and breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.