Join us  

भाग्यश्री सांगते प्रोटीन्सचा खजिना असणाऱ्या पॅटीसची खास रेसिपी! अतिशय चटपटीत- भरपूर पौष्टिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 2:48 PM

Protein Pattice Recipe By Actress Bhagyashree: भरपूर प्रोटीन्स देणारे हे पॅटीस मुलांच्या डब्यात देण्यासाठी चांगले आहेत. तसेच नाश्त्याला खाण्यासाठीही अगदी उत्तम आहेत. बघा कसे करायचे प्रोटीन पॅटीस (how to make protein pattice?)

ठळक मुद्देभरपूर प्रोटीन्स देणारे हे पॅटीस अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतात. 

बहुतांश शाकाहारी लोकांच्या आहारात प्रोटीन्सची कमतरता आढळून येते. त्यातही महिलांचे प्रमाण जरा जास्तच आहे. लहान मुलांमध्येही प्रोटीन्सची कमतरता असतेच. त्यामुळे आहारातले प्रोटीन्सचे प्रमाण वाढावे यासाठी या खास प्रोटीन पॅटीसची रेसिपी बघा. अभिनेत्री भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर ही रेसिपी शेअर केली असून त्याला 'प्रोटीन पॅटीस' असेच नाव दिले आहे (how to make protein pattice?). या पॅटीसमधून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स तर मिळतीलच, पण त्यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, लोह असे इतर पौष्टिक घटकही भरपूर प्रमाणात मिळतील. (Protein Pattice Recipe By Actress Bhagyashree)

 

प्रोटीन पॅटीस करण्याची रेसिपी 

१ वाटी हरभरे 

१ वाटी उडीद डाळ 

१ वाटी राजमा

गौरी- गणपतीसमोर काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या- बघा झटपट काढून होणाऱ्या ६ सोप्या डिझाईन्स

१ वाटी छोले 

चवीनुसार मीठ 

२ टीस्पून आमचूर पावडर 

१ टेबलस्पून आलं-लसूण- मिरची पेस्ट 

१ टेबलस्पून कोथिंबीर 

१ टीस्पून धने- जिरेपूड

१ चमचा तूप 

थोडंसं तेल 

 

कृती 

सगळ्यात आधी तर राजमा, छोले, हरभरे आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजत घाला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी हे चारही पदार्थ कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या करून उकडून घ्या. 

गौरींच्या नैवेद्यात लाल भोपळ्याचे एवढे महत्त्व का? ६ फायदे- आरोग्यासोबतच घेतो सौंदर्याचीही काळजी

उकडलेले पदार्थ मिक्सरमधून फिरवून त्याची जाडीभरडी पेस्ट करा आणि ती कढईत थोडं तूप टाकून परतून घ्या. 

आता कढईतले मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, आमचूर पावडर, धने- जिरेपूड असं सगळं साहित्य टाकून ते व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

आता त्याचे छोटे छोटे पॅटीस तयार करा आणि ते तव्यावर तेल किंवा तूप टाकून शॅलो फ्राय करा. 

भरपूर प्रोटीन्स देणारे हे पॅटीस अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाग्यश्री