Lokmat Sakhi >Food > मिश्र डाळींचे डोसे, नाश्त्याला भरपूर प्रोटीन! मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ- बघा सोपी रेसिपी

मिश्र डाळींचे डोसे, नाश्त्याला भरपूर प्रोटीन! मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ- बघा सोपी रेसिपी

Protein Rich Breakfast: मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी एक अतिशय उत्तम पदार्थ.. (how to make perfect dosa)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 09:33 AM2024-06-19T09:33:49+5:302024-06-19T16:42:16+5:30

Protein Rich Breakfast: मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी एक अतिशय उत्तम पदार्थ.. (how to make perfect dosa)

protein rich breakfast, perfect menu for kids tiffin, how to make perfect dosa, most healthy dosa recipe | मिश्र डाळींचे डोसे, नाश्त्याला भरपूर प्रोटीन! मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ- बघा सोपी रेसिपी

मिश्र डाळींचे डोसे, नाश्त्याला भरपूर प्रोटीन! मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ- बघा सोपी रेसिपी

Highlightsसकाळच्या धावपळीच्या वेळेस ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे.

तांदूळ आणि उडीद डाळ घालून केलेले डोसे आपण नेहमीच खातो. हे डोसे तर पौष्टिक असतातच. पण त्याऐवजी डोसा करण्यासाठी पीठ भिजवताना जर त्यात उडदाच्या डाळीसोबतच इतरही डाळी घातल्या आणि त्या तुलनेत तांदळाचे प्रमाण कमी केले तर ते डोसे नक्कीच अधिक पौष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर प्रोटीन्स देणारे असतील (protein rich breakfast). यानिमित्ताने मुलांच्याही पोटात एकाचवेळी अनेक डाळी जातील. त्यामुळेच बघा ही सोपी रेसिपी. सकाळच्या धावपळीच्या वेळेस ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. (most healthy dosa recipe)

मिश्र डाळींचे डोसे करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ कप मसूर डाळ

१ कप हरबरा डाळ

१ कप उडीद डाळ

१ कप मुगाची डाळ

तळहात चेहऱ्यावर जोरात घासून मॉईश्चरायझर लावता? चाळिशीनंतरही तरुण दिसायचं तर बघा योग्य पद्धत...

१ कप तांदूळ

कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर अशा बारीक चिरलेल्या भाज्या १ वाटी

२ हिरव्या मिरच्या

५ ते ६ पाकळ्या लसूण

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

 

कृती

मूग, मसूर, हरबरा, उडीद अशा सगळ्या डाळी आणि तांदूळ एका भांड्यात घ्या आणि २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या.

यानंतर सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्रित करूनच रात्रभर पाण्यात भिजत घाला.

अलका याज्ञिकना अचानक ऐकू येणं झालं बंद, हा आजार नेमका काय? कशाने होतो?

सकाळी उठल्यानंतर डाळ- तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. वाटत असतानाच त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण टाका. 

यानंतर वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यामध्ये बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या, कोथिंबीर, मीठ घाला. या पिठाला थोडा आंबटपणा पाहिजे असेल तर तुम्ही त्यात दही, ताक किंवा लिंबाचा रस घालू शकता.

असं पीठ तयार करून घेतलं की त्याचे नेहमीप्रमाणे तव्याला तेल लावून लहान लहान डोसे करा. हे डोसे खूप पातळ पसरवू नका. नाहीतर ते तव्याला चिटकून बसू शकतात.

 

Web Title: protein rich breakfast, perfect menu for kids tiffin, how to make perfect dosa, most healthy dosa recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.