नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. त्यामुळे नाश्त्याच्या पदार्थांत प्रोटीन, व्हिटॅमिन्स असायलाच हवेत. त्यातही आपण जीममध्ये जाऊन व्यायाम करत असू तर आपला सकाळचा आहार हा पौष्टीक आणि शरीराला ताकद देणारा असाच हवा. आपण साधारपणपणे नाश्त्याला पोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी, फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी असे पदार्थ करतो. मात्र त्या पदार्थांनी शरीराचे म्हणावे तसे पोषण होतेच असे नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये शरीराला आवश्यक असे पोषक घटक मिळणे गरजेचे असते. आता पोषक म्हणजे नेमकं काय आणि ते करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर आपल्याला ते करणं शक्य आहे का या गोष्टींचाही विचार व्हायला हवा. पूनम देवनानी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी एक अतिशय महत्त्वाची रेसिपी देतात. ही रेसिपी कशी करायची पाहूया (Protein Rich Breakfast Recipe Easy and Healthy)...
१. सगळ्यात आधी पॅनमध्ये तूप घालायचं आणि त्यामध्ये उकडलेला सालांसहित मिळणारा हरभरा आणि छोले घालायचे. यात काळी मिरी, मीठ आणि चाट मसाला घालून पॅनमध्ये ते सगळे चांगले एकजीव करायचे.
२. यामध्ये फ्रोजन मटार, उकडलेल्या कणसाचे दाणे घालायचे आणि सगळे पॅनमध्ये एकसारखे परतून घ्यायचे.
३. चांगली वाफ आली की झाकण उघडून या मिश्रणात लिंबू पिळायचे.
४. हे सगळे वाफवले की एका प्लेटमध्ये काढायचे आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो कोथिंबारी आणि भाजलेले जाणे घालून खायला घ्यायचे.
५. भरपूर प्रोटीन्स आणि ऊर्जा देणारा हा ्बरेकफास्ट तुम्हा आठवड्यातून किमान ३ वेळा तरी नक्की करायाल हवा.