Lokmat Sakhi >Food > कोण म्हणतं चटणीमधून प्रोटीन मिळत नाही? खोबरे-हरबरा डाळ-तीळ-पाहा हाडांसाठी पोषक चटणी

कोण म्हणतं चटणीमधून प्रोटीन मिळत नाही? खोबरे-हरबरा डाळ-तीळ-पाहा हाडांसाठी पोषक चटणी

Protein rich chutney for Idli/Dosa in 5 min : आपली नेहमीची चटणी पण भरपूर पोषण देते, अजून पौष्टिक करण्याची पाहा सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 06:33 PM2024-01-11T18:33:03+5:302024-01-11T18:33:55+5:30

Protein rich chutney for Idli/Dosa in 5 min : आपली नेहमीची चटणी पण भरपूर पोषण देते, अजून पौष्टिक करण्याची पाहा सोपी कृती

Protein rich chutney for Idli/Dosa in 5 min | कोण म्हणतं चटणीमधून प्रोटीन मिळत नाही? खोबरे-हरबरा डाळ-तीळ-पाहा हाडांसाठी पोषक चटणी

कोण म्हणतं चटणीमधून प्रोटीन मिळत नाही? खोबरे-हरबरा डाळ-तीळ-पाहा हाडांसाठी पोषक चटणी

चटणी (Chutney) शिवाय मजा नाही. असे आपण अनेकांकडून ऐकलं असेल. जेवणात चटणी असली की, आपण २ घास जास्त खातो. जिभेची चव वाढवण्यासाठी जेवणाच्या थाळीत चटणी हवीच. चटणी अनेक प्रकारची केली जाते. शिवाय त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. पण आपण कधी प्रोटीन-रिच चटणी खाऊन पाहिली आहे का?

प्रोटीन रिच खोबऱ्याची चटणी फक्त जिभेची चव वाढवत नसून, शरीराला प्रोटीनही प्रदान करते (Cooking Tips). आरोग्य उत्तम राखण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करून घेणे गरजेचं आहे. प्रोटीन रिच चटणी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, शिवाय फिटनेससाठीही उपयुक्त ठरते. खोबरं वापरून प्रोटीन रिच चटणी कशी तयार करायची? पाहूयात(Protein rich chutney for Idli/Dosa in 5 min).

साहित्य

तेल

भोपळ्याच्या बिया

शेंगदाणे

चणा डाळ

पांढरे तीळ

जिरं

काजू

भोगीला तीळ लावून बाजरीची भाकरी करताना लक्षात ठेवा २ टिप्स, भाकरी वातड होणार नाहीत

लाल सुक्या मिरच्या

आलं

कोथिंबीर

लसूण

चिंच

खोबरं

मोहरी

उडीद डाळ

कढीपत्ता

तेल

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे आणि चणा डाळ घालून भाजून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात एक चमचा पांढरे तीळ, एक चमचा जिरं आणि ४ ते ५ काजू घालून परतवून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा, २ हिरव्या मिरच्या, २ लाल सुक्या मिरच्या, एक इंच आलं, कोथिंबीर आणि ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या घालून मिक्स करा.

काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत

भाजलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात चिंच, वाटीभर किसलेलं खोबरं आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य वाटून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. दुसरीकडे फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, जिरे, चणा डाळ, उडीद डाळ आणि कढीपत्ता घालून मिक्स करा. तयार फोडणी चटणीवर ओतून मिक्स करा. अशा प्रकारे खोबऱ्याची प्रोटीन रिच चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी इडली, डोसा, मेदू वडा किंवा पोळीसोबतही खाऊ शकता.

Web Title: Protein rich chutney for Idli/Dosa in 5 min

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.