दिवाळीचे मागचे काही दिवस सातत्याने गोड खाणं झालेलं असतं. किंवा शेव, चकली, चिवडा असे फराळाचे पदार्थ संपेपर्यंत आपण ते खातो. त्यामुळे मग शेवटी त्यांचाही कंटाळा येऊ लागतो. तोंडाची चव गेल्यासारखी वाटते. अशावेळी मग वेगळं काहीतरी चटकदार, चटपटीत खाण्याची इच्छा होते. जेवणात ताेंडी लावायला झणझणीत ठेचा, लोणचं, चटणी असं काहीतरी असावं असं वाटू लागतं (how to make mint coriander chutney?). म्हणून अशा वेळी अगदी परफेक्ट ठरणारा पदार्थ म्हणजे पुदिन्याची चटपटीत चटणी (green chutney recipe). ही चटणी जर जेवणात तोंडी लावायला असेल तर तोंडाला छान चव तर येईलच पण जेवणाची मजाही आणखी वाढेल.(pudina chutney recipe)
पुदिना चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१५० ग्रॅम कोथिंबीर
७५ ग्रॅम पुदिना
५० ग्रॅम पालक
तळपाय खरखरीत होऊन भेगा पडायला सुरुवात झाली? थेंबभर तेलाचा 'हा' उपाय करा- टाचा मऊ होतील
३ ते ४ हिरव्या मिरच्या
३ ते ४ लसूण पाकळ्या
आल्याचा तुकडा १ इंच
१ लिंबू
१ टीस्पून आमचूर पावडर
कृती
सगळ्यात आधी तर पुदिना, कोथिंबीर आणि पालक गरम पाण्यात टाका आणि ३० सेकंदाने ते बाहेर काढून लगेच बर्फाच्या थंडगार पाण्यात टाका.
केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की
अशा पद्धतीने तिन्ही भाज्या धुतल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यासोबतच आलं, मिरचीचे तुकडे, लसूण, जीरे असं सगळं घालून मिक्सरमधून ते बारीक वाटून घ्या.
त्यानंतर मिक्सरमधलं वाटण एका भांड्यात काढा. त्यात लिंबू पिळा, आमचूर पावडर, मीठ घाला आणि चटणीला आणखी थोडा चटपटीतपणा येण्यासाठी त्यात अगदी थोडी साखरही घाला. ही चटणीही तुम्ही तोंडी लावू शकता किंवा त्यात थोडा बदल करून आणखी वेगळ्या चवीची चटणीही करू शकता.
त्यासाठी एका भांड्यात दही घ्या. दह्यामध्ये मीठ, चाट मसाला, धने- जीरे पूड घालून ते व्यवस्थित हलवून घ्या. जेवढं दही असेल त्याच्या दुप्पट वरील पद्धतीने तयार केलेली चटणी घाला. दही आणि चटणी व्यवस्थित हलवून घ्या. वेगळ्या चवीची आणखी एक चटणी तयार.. या चटणीला तुम्ही मोहरी, हिंग, कडिपत्ता घालून खमंग फोडणीही देऊ शकता.