Join us  

करा पुदिना चटणी, चमचमीत चव आणि करायला खूप सोपी - जेवण होईल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 1:36 PM

Pudina Chutney Recipe (Mint Chutney) चपाती, वरण - भाताबरोबर खायला करा पुदिन्याची चटपटीत चटणी, कमी साहित्यात १० मिनिटात चटणी रेडी

जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. काहींना चटणीशिवाय जमत नाही. स्नॅक्स व इतर पदार्थाची चव वाढवण्याचं काम चटणी करते. ओली व सुकी चटणी आवडीप्रमाणे खाल्ली जाते. चटणी अनेक प्रकारची केली जाते. खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाची चटणी आपण खाल्लीच असेल.

पण आपण कधी पुदिन्याची चटणी खाल्ली आहे का? पुदिन्याची चटणी आपण समोसा, वडा पाव, भजीसोबत खाल्ली असेल. पण पुदिन्याची ही चटणी थोडी वेगळी आहे. आपण ही चटणी पुरी, चपाती, किंवा इतर स्नॅक्ससोबत खाऊ शकता. चला तर मग या चटपटीत चटणीची कृती पाहूयात(Pudina Chutney Recipe - Mint Chutney).

पुदिन्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

पुदिना

कोथिंबीर

हिरवी मिरची

तेल

जिरं

धणे

उडीद डाळ

चणा डाळ

हिंग

नाश्त्याला करा इन्स्टंट रवा ढोकळा, गुजराथी रेसिपी करायला सोपी - पोटभर आणि पौष्टिक

तीळ

काश्मिरी लाल मिरची

टोमॅटो

मीठ 

चिंचेचा कोळ

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा जिरं, २ चमचे धणे, एक चमचा उडीद डाळ, एक चमचा चणा डाळ, एक चमचा हिंग,  २ चमचे तीळ घालून साहित्य भाजून घ्या. आता त्यात पुदिना, कोथिंबीर, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, आलं, काश्मिरी लाल मिरची, टोमॅटो घालून मिक्स करा.

पास्ता किंवा बिर्याणी - पुलावसाठी भात शिजवताना पाणी फेकून देता? पाहा चाळणी वापरण्याची नवी ट्रिक

मिश्रण मिक्स झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्या. त्यात भाजलेलं मिश्रण घाला, व एक चमचा मीठ, चिंचेचा कोळ घालून पेस्ट तयार करा. फोडणीच्या पळीत तेल गरम करा, त्यात मोहरी, जिरं, कडीपत्ता, घालून चटणीवर फोडणी द्या. अशा प्रकारे पुदिन्याची चटपटीत चटणी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स