मुरमूऱ्यांचा वापर आपण भेळ, चिवडा किंवा भडंग करण्यासाठी करतो (Puffed rice dosa). मुरमूऱ्यांचा चिवडा आपण आवडीने खातो. छोटी भूक भागवण्यासाठी हा पदार्थ बेस्ट मानला जातो (food). काही जण मुरमूऱ्याचे विविध पदार्थ करून पाहतात. पण आपण कधी मुरमूऱ्यांचा डोसा करून पाहिलं आहे का? दाक्षिणात्य पदार्थ आपण आवडीने खातो (Cooking tips).
नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडे, आप्पे खातो. पण हे वेळखाऊ पदार्थ बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते. शिवाय डाळ -तांदूळ भिजत न घालता हे पदार्थ तयार होत नाही. जर आपल्याला इन्स्टंट डोसे खायचे असतील तर, डाळ - तांदूळ भिजत न घालता मुरमूऱ्यांचा डोसा करून पाहा. अगदी काही मिनिटात कुरकुरीत डोसे रेडी होतील(puffed rice dosa | instant murmura dosa | dosa recipe).
मुरमूऱ्यांचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
मुरमुरे
पाणी
रवा
डाळ भिजतही न घालता फक्त १५ मिनिटांत करा क्रिस्पी मेदूवडे, ब्रेडचे मेदूवडे करण्याची पाहा युक्ती..
ताक
मीठ
कृती
रोज चपातीसोबत खायला करा लसूण - शेंगदाण्याची झणझणीत चटणी; तोंडाला येईल चव
सर्वात आधी एका बाऊलमध्ये १ कप मुरमुरे घ्या. त्यात पाणी घालून १० मिनिटांसाठी भिजत ठेवा. १० मिनिटानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढा. नंतर त्यात अर्धा कप रवा, अर्धा कप ताक आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात काढून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.
बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. अर्धा तासासाठी त्यावर झाकण ठेवा. अर्धा तासानंतर गॅस चालू करा आणि पॅन ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यावर बटर किंवा चमचाभर ब्रशने तेल लावा, व चमचाभर बॅटर ओतून पसरवा. ज्याप्रमाणे आपण डोसे तयार करतो. त्याचप्रमाणे या बॅटरचे डोसे तयार करा. दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्या. अशा प्रकारे मुरमूऱ्यांचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी.