नाश्ता म्हटलं की आपल्याला इडली, डोसा, मेदू वडा, पोहे, उपमा हे पदार्थ आठवतात. अनेकांना उपमा हा पदार्थ आवडतो. रव्यापासून तयार उपमा चवीला उत्कृष्ट व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उपमा खाण्याचे अनेक फायदे आहेत. हा एक पौष्टीक पदार्थ आहे. पण आपण कधी मुरमुऱ्यांचा उपमा खाल्ला आहे का? काहींना रव्याचा उपमा खाऊन कंटाळा येतो.
आपल्याला देखील नाश्त्यामध्ये हटके खाण्याची इच्छा झाली असेल तर, मुरमुऱ्यांचा उपमा ही रेसिपी ट्राय करून पाहा. साहजिक आपण मुरमुऱ्यांचा चिवडा खाल्ला असेल, पण आता मुरमुऱ्यांचा उपमा ही रेसिपी ट्राय करून पाहा. मुरमुऱ्यांचा उपमा कमी साहित्यात तयार होतो. चला तर मग या झटपट पदार्थाची चमचमीत कृती पाहूयात(Puffed Rice Upma Recipe - Murmura Upma).
मुरमुऱ्यांचा उपमा करण्यासाठी लागणारं साहित्य
मुरमुरे
चणा डाळ
लाल सुक्या मिरच्या
कोबीचे कबाब!-खरं नाही वाटत ना, पण कोबीचे खमंग कुरकुरीत कबाब करायला सोपे आणि चविष्ट
लसणाच्या पाकळ्या
तेल
जिरं
मोहरी
उडीद डाळ
शेंगदाणा
कांदा
हिरवी मिरची
टोमॅटो
कडी पत्ता
हळद
मीठ
अशा पद्धतीने करा मुरमुऱ्यांचा उपमा
सर्वप्रथम, एका भांड्यात २ प्लेट मुरमुरे घ्या, मुरमुऱ्यांमध्ये पाणी घालून काही वेळेसाठी ठेवा. मुरमुरे भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढा. व मुरमुरे एका मोठ्या प्लेटमध्ये पसरवून ठेवा. मिक्सरचं भांडं घ्या, त्यात एक कप चणा डाळ, २ लाल सुक्या मिरच्या, व ४ ते ५ पाच लसणाच्या पाकळ्या घालून बारीक पावडर वाटून घ्या.
दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा, त्यात २ चमचे तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ घालून भाजून घ्या. नंतर त्यात एक कप शेंगदाणे, बारीक चिरलेला एक कांदा, ४ ते ५ बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून साहित्य भाजून घ्या. कांदा लाल झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, कडीपत्ता, हळद, चवीनुसार मीठ घालून मिश्रण भाजून घ्या.
१ वाटी बेसनपीठ फक्त हवं, घरीच करा कुरकुरीत कुरकुरे, विकतपेक्षा भारी-घरच्याघरी
आता १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन मिश्रणाला एक वाफ द्या. १० मिनिटानंतर त्यात भिजवलेले मुरमुरे व चणाच्या डाळीची तयार पावडर घालून मिश्रण मिक्स करा. शेवटी कोथिंबीर व लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे मुरमुऱ्यांचा उपमा खाण्यासाठी रेडी.