Join us  

फक्त ४ पदार्थ आणि चवदार- खमंग पुलाव मसाला तयार, पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 4:54 PM

Pulao Masala Recipe With Just 4 Ingredients: हॉटेलसारखा चमचमीत पुलाव आता घरीच तयार करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही खास रेसिपी एकदा बघाच.

ठळक मुद्देघरच्याघरीच इतका छान पुलाव तयार होईल की बाहेरून पुलाव ऑर्डर करण्याची गरजच भासणार नाही.

पुलाव हा तसा अनेकांचा आवडीचा पदार्थ. शिवाय करायलाही तसा सोपा. त्यामुळे घरी छोटेखानी कार्यक्रम असला की अनेक जणी जेवणाच्या मेन्यूमध्ये पुलाव (How to make pulao masala at home?) अवश्य करतात. पुलाव करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही पावभाजी केलेली असो, भाजी- पोळी केलेली असो किंवा मग पुरी भाजी केलेली असो... या कोणत्याही प्रकारच्या जेवणासोबत पुलावचं कॉम्बिनेशन परफेक्ट मॅच होऊन जातं. पण कधी कधी पुलावची चव बिघडते आणि मग सगळ्याच जेवणाचा बेरंग होतो. त्यासाठीच कुणाल कपूर (Pulao masala recipe by celebrity chef Kunal Kapoor) यांनी शेअर केलेली ही पुलाव मसाला रेसिपी एकदा बघाच.

 

ही रेसिपी वापरून पुलाव मसाला घरच्या घरीच तयार केला तर पुलावचा बेत सहजासहजी फसणार नाही. शिवाय घरच्याघरीच इतका छान पुलाव तयार होईल की बाहेरून पुलाव ऑर्डर करण्याची गरजच भासणार नाही. पुलाव मसाला करण्याची ही रेसिपी अतिशय सोपी असून त्यासाठी कुणाल यांनी फक्त ४ पदार्थ वापरले आहेत. शिवाय हे चारही पदार्थ आपल्याघरी अगदी सहज उपलब्ध होतील असेच आहेत. बघा नेमका कशा पद्धतीने त्यांनी मसाला तयार केलाय..

 

पुलाव मसाला रेसिपीसाहित्य१० ते १२ लवंग७ ते ८ वेलची

जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, हिवाळ्यात त्वचेला लावते खास होममेड क्रिम.. तुम्हीही वापरून बघाएक ते दिड इंचाचे दालचिनीचे २ ते ३ तुकडे २ टेबलस्पून बडिशेप

 

कृती१. सगळ्यात आधी लवंग कढईमध्ये टाकून भाजून घ्या.

२. त्यानंतर वेलची, नंतर दालचिनी आणि सगळ्यात शेवटी बडिशेप टाकून २ ते ३ मिनिटे भाजून घ्या.

सोनम कपूरच्या बाळाचं सुरेख बेडरूम, नातवासाठी आजीने करून घेतलं खास डिझाईन, फोटो व्हायरल

३. हे चारही पदार्थ भाजून घेताना गॅस मंद असावा. मोठ्या गॅसवर मसाले जळून जातात आणि त्यांचा सुगंध नष्ट होतो.

४. भाजून घेतल्यानंतर हे पदार्थ थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्यांची बारीक पावडर करून घ्या.

५. अवघ्या ५ ते ७ मिनिटांत पुलाव मसाला तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर