Lokmat Sakhi >Food > पुलाव काही केल्या परफेक्ट चवीचा होत नाही? फक्त ४ पदार्थांचा मसाला करा, हॉटेलसारखा पुलाव करा घरीच....

पुलाव काही केल्या परफेक्ट चवीचा होत नाही? फक्त ४ पदार्थांचा मसाला करा, हॉटेलसारखा पुलाव करा घरीच....

Pulao Masala Recipe By Chef Kunal Kapur: पुलाव करायला गेलं की नेमकं काहीतरी हुकतं आणि मग त्याची परफेक्ट चव येत नाही. म्हणूनच आता सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची ही खास पुलाव मसाला रेसिपी बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2023 02:45 PM2023-10-02T14:45:13+5:302023-10-02T14:45:57+5:30

Pulao Masala Recipe By Chef Kunal Kapur: पुलाव करायला गेलं की नेमकं काहीतरी हुकतं आणि मग त्याची परफेक्ट चव येत नाही. म्हणूनच आता सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची ही खास पुलाव मसाला रेसिपी बघा.

Pulao masala recipe by chef Kunal Kapur, How to make delicious pulao? How to Make pulao masala at home, easy recipe of pulao masala | पुलाव काही केल्या परफेक्ट चवीचा होत नाही? फक्त ४ पदार्थांचा मसाला करा, हॉटेलसारखा पुलाव करा घरीच....

पुलाव काही केल्या परफेक्ट चवीचा होत नाही? फक्त ४ पदार्थांचा मसाला करा, हॉटेलसारखा पुलाव करा घरीच....

Highlightsसेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही रेसिपी वापरून पुलाव मसाला तयार करा

पुरी भाजी असो, पराठे असो किंवा मग पोळ्या आणि एखादी चमचमीत भाजी असो. अशा कुठल्याही मेन्यूसोबत भाताचा एखादा प्रकार करायचा असेल तर पुलाव अगदी सहज त्यात फिट होऊन जातो. पण बऱ्याचदा पुलावचा बेत फसतो आणि हवी तशी परफेक्ट चव मिळत नाही (How to make delicious pulao?). म्हणूनच आता सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही रेसिपी वापरून पुलाव मसाला तयार करा (How to Make pulao masala at home?). हा मसाला पुलावमध्ये घातला की अगदी हॉटेल सारखा पुलाव घरीच तयार होईल. करून पाहा....(Pulao masala recipe by chef Kunal Kapur)

 

पुलाव मसाला तयार करण्याची रेसिपी

साहित्य

८ ते १० लवंग

८ ते १० वेलची

काय भलतंच! ‘तिने’ चक्क कब्रस्तानात केलं मॅटर्निटी फोटोशूट; पण तिने ‘असं’ का केलं असेल?

दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 

१ टेबलस्पून बडीशेप

 

रेसिपी

१. कढई गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात लवंग, वेलची, दालचिनी आणि बडीशेप टाकून भाजून घ्या.

२. हे पदार्थ खूप जास्त भाजू नका. फक्त मंद गॅसवर एखादा मिनिट ठेवा.

तुम्ही पाणी कमी पित आहात हे सांगणारी ५ लक्षणं, बघा तुम्हालाही असा त्रास होतोय का?

३. त्यानंतर भाजलेले पदार्थ थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या.

४. हा झाला पुलाव मसाला तयार... पुलाव करताना हा मसाला थोडासा जरी टाकला तरी अगदी हॉटेल सारखा चमचमीत पुलाव घरीच तयार होईल.

 

हे देखील लक्षात घ्या

हा मसाला तयार करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही पदार्थासाठी मसाला तयार करायचा असेल तेव्हा मसाल्याचे पदार्थ खूप जास्त भाजू नका.

"मी मुलाला पासवर्ड विचारला आणि मला धक्काच बसला कारण....." ट्विंकल खन्ना सांगते, मुलगा २१ वर्षांचा झाला आणि..

दुसरी गोष्ट म्हणजे भाजून घेतल्यानंतर मसाल्याचे पदार्थ पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच मिक्सरमधून वाटून घ्या. असे केल्यामुळे मसाल्याचा स्वाद कायम राहील.

 

Web Title: Pulao masala recipe by chef Kunal Kapur, How to make delicious pulao? How to Make pulao masala at home, easy recipe of pulao masala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.