Lokmat Sakhi >Food > ललिता पंचमीला करा खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे ; ही घ्या पारंपरिक रेसिपी; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट...

ललिता पंचमीला करा खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे ; ही घ्या पारंपरिक रेसिपी; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट...

Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami : कधी हे घारगे खूप कडक होतात तर कधी अगोड, असे होऊ नये म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 08:25 AM2023-10-19T08:25:48+5:302023-10-19T08:30:02+5:30

Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami : कधी हे घारगे खूप कडक होतात तर कधी अगोड, असे होऊ नये म्हणून...

Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami : Make crispy pumpkin gharga for Lalita Panchami; Here's a traditional recipe; Goddess' offering will be tasty... | ललिता पंचमीला करा खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे ; ही घ्या पारंपरिक रेसिपी; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट...

ललिता पंचमीला करा खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे ; ही घ्या पारंपरिक रेसिपी; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट...

नवरात्रातील ललिता पंचमीला ज्याप्रमाणे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे या दिवशी लाल भोपळ्याचे घारगेही आवर्जून केले जातात. गोड चवीचे खुसखुशीत घारगे करायचे तर त्यातील सगळे जिन्नस योग्य प्रमाणात घ्यावे लागतात. नाहीतर कधी हे घारगे खूप कडक होतात तर कधी अगोड. पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे घारगे आरोग्यासाठीही अतिशय चांगले असतात. भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळे लाल भोपळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यातील अॅंटीऑक्सिडंट्समुळे आरोग्याच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. लाल भोपळ्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यासाठी आणि भूकेवर नियंत्रण राहण्यास मदत होते. पाहूयात घारगे करण्याची सोपी पद्धत (Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami)...

साहित्य -

१. लाल भोपळा - किस - २ वाट्या 

२. गूळ - १ ते १.५ वाटी 

३. तांदळाचे पीठ - अर्धी वाटी 

(Image : Google )
(Image : Google )

४. गव्हाचे पीठ - अंदाजे 

५. मीठ - चीमूटभर 

६. तूप - २ चमचे 

७. तेल - २ वाट्या 

कृती - 

१. लाल भोपळा बारीक किसून घ्यायचा.

२. कढईत २ चमचे तूप घालून त्यामध्ये किसलेला भोपळा घालून तो चांगला परतून घ्यायचा.

३. भोपळा थोडा शिजत आला की त्यामध्ये गूळ घालून मिश्रण चांगले हलवत राहायचे. 

(Image : Google )
(Image : Google )

४. गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते आणि भोपळा आणि गूळ एकजीव चांगला शिजतो. 

५. हे मिश्रण थोडी गार होऊ द्यायचे. 

६. या मिश्रणात तांदळाचे पीठ, चवीला मीठ आणि त्यात बसेल तितकेच गव्हाचे पीठ घालायचे. 

७. हे पीठ मळताना तेल, पाणी या कशाचाच वापर न करता चांगले घट्ट पीठ मळून घ्यायचे.

८. पीठ मळून झाल्यावर १५ मिनीटे ते बाजूला ठेवायचे. 

९. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचे.

१०. १५ मिनीटांनी तेल न लावता थोडे जाडसर घारगे लाटून त्या तेलात मध्यम आचेवर लालसर तळून घ्यायच्या. 

११. गार झाल्यावर हे घारगे तूप घालून किंवा नुसतेही खायला खूप मस्त लागतात. 


 

Web Title: Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami : Make crispy pumpkin gharga for Lalita Panchami; Here's a traditional recipe; Goddess' offering will be tasty...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.