Lokmat Sakhi >Food > श्रावण स्पेशल : भोपळ्याची पुरणपोळी खाऊन तर पाहा, नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी -फक्त २० मिनिटांत ताटात

श्रावण स्पेशल : भोपळ्याची पुरणपोळी खाऊन तर पाहा, नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी -फक्त २० मिनिटांत ताटात

PUMPKIN WHEAT PURAN POLI sweetened with jaggery : पुरणपोळीचं गणित नेहमी चुकतं? भोपळ्याची करून पाहा पुरणपोळी - बनतील परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 05:48 PM2024-08-16T17:48:52+5:302024-08-16T18:05:32+5:30

PUMPKIN WHEAT PURAN POLI sweetened with jaggery : पुरणपोळीचं गणित नेहमी चुकतं? भोपळ्याची करून पाहा पुरणपोळी - बनतील परफेक्ट

PUMPKIN WHEAT PURAN POLI sweetened with jaggery | श्रावण स्पेशल : भोपळ्याची पुरणपोळी खाऊन तर पाहा, नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी -फक्त २० मिनिटांत ताटात

श्रावण स्पेशल : भोपळ्याची पुरणपोळी खाऊन तर पाहा, नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी -फक्त २० मिनिटांत ताटात

सणावाराला आपण अनेक घरांमध्ये पुरणपोळी केली जाते (Food). डाळ - गुळाची पुरणपोळी आपण खातोच. काहींना डाळ - गुळाची पुरणपोळी जमते. तर काहींचे प्रमाण चुकते (Cooking Tips). ज्यामुळे पुरणपोळी व्यवस्थित जमत नाही. पण सणासुदीला पुरणपोळीचा बेत आखणं गरजेचं आहे (Kitchen Tips).

जर आपल्याला डाळ - गुळाची पुरणपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा भोपळ्याची पुरणपोळी करून पाहा. नेहमीपेक्षा चवीला वेगळी होईल पुरणपोळी. शिवाय झटपट तयार होईल. जास्त मेहनत न घेता परफेक्ट पूरणपोळी जमतील(PUMPKIN WHEAT PURAN POLI sweetened with jaggery).

भोपळ्याची पुरणपोळी कशी करायची?

लागणारं साहित्य


भोपळा

गुळ

कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

तूप

बेसन

वेलची पूड

जायफळ पूड

हळद

पाणी

कृती

सर्वात आधी लाल भोपळ्याची साल काढून घ्या. त्याचे तुकडे करा. प्रेशर कुकरच्या भांड्यात भोपळ्याचे तुकडे ठेवा, भांडं प्रेशर कुकरमध्ये ठेवा. २ शिट्ट्यानंतर गॅस बंद करा, भांड्यातून भोपळा काढून मॅश करा. मॅश केलेला भोपळा एका मोठ्या परातीत काढून घ्या. त्यात किसलेला गुळ घालून मॅशरने साहित्य एकजीव करा.

दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात दोन चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक कप बेसन घालून भाजून घ्या. त्यात मॅश केलेला भोपळा घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा वेलची आणि जायफळ पूड घालून मिक्स करा. अशा प्रकारे सारण रेडी.

एका बाऊलमध्ये २ कप गव्हाचं पीठ घ्या. एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात चिमुटभर हळद घालून मिक्स करा. हळदीच्या पाण्याने कणिक मळून घ्या. कणिक एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात पाणी घालून झाकण लावा. पाण्यात कणिक व्यवस्थित भिजेल.

मल्लिका शेरावतसारखा ग्लो हवा, मग प्या १ ग्लास ‘हे’ ग्रीन ज्यूस! चाळिशीतही दिसेल विशीची चमक

१० मिनिटानंतर पाण्यातून भिजलेली कणिक बाहेर काढा, त्यात एक चमचा तेल ओतून पुन्हा कणिक मळून घ्या. अशा प्रकारे आपलं कणिकही रेडी. कणकेचा गोळा घ्या, त्याची पारी तयार करून त्यात सारण भरा, आणि पोळी लाटून घ्या. आता तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पोळी घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. पोळी भाजताना त्यावर तुपाची धार सोडा. जेणेकरून पुरणपोळी चवीला खुसखुशीत चविष्ट लागतील.

Web Title: PUMPKIN WHEAT PURAN POLI sweetened with jaggery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.