Lokmat Sakhi >Food > पंजाबी सरसों दा साग थंडीत खाण्याची खास मजा; सुप्रिया सुळेंनाही आवडली चव

पंजाबी सरसों दा साग थंडीत खाण्याची खास मजा; सुप्रिया सुळेंनाही आवडली चव

Punjabi Food: सरसो का साग आणि मक्के की रोटी (sarso ka saag and makke ki roti).... हा खास पंजाबी मेन्यू (Punjabi menu) कडाक्याच्या थंडीत (winter) चाखून बघाच... केवळ जीभेचे लाड पुरवायचे म्हणून नाही, तर आरोग्यासाठीही ठरेल अतिशय उपयुक्त ... सुप्रिया सुळेंनाही (Supriya Sule) भलताच आवडतो म्हणे हा पदार्थ... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 04:40 PM2021-12-05T16:40:57+5:302021-12-05T16:42:29+5:30

Punjabi Food: सरसो का साग आणि मक्के की रोटी (sarso ka saag and makke ki roti).... हा खास पंजाबी मेन्यू (Punjabi menu) कडाक्याच्या थंडीत (winter) चाखून बघाच... केवळ जीभेचे लाड पुरवायचे म्हणून नाही, तर आरोग्यासाठीही ठरेल अतिशय उपयुक्त ... सुप्रिया सुळेंनाही (Supriya Sule) भलताच आवडतो म्हणे हा पदार्थ... 

Punjabi Food: Benefits of eating sarso ka saag in winter, Healthy food Recipe | पंजाबी सरसों दा साग थंडीत खाण्याची खास मजा; सुप्रिया सुळेंनाही आवडली चव

पंजाबी सरसों दा साग थंडीत खाण्याची खास मजा; सुप्रिया सुळेंनाही आवडली चव

Highlightsथंडीच्या दिवसात अगदी बिनधास्तपणे हा पदार्थ चाखून पहा. सरसो का साग आणि मक्के की रोटी हा आहार लो कॅलरी डाएट मानला जातो.

अस्सल पंजाबी फूड खायचे असेल तर चटकन पंजाब दि लस्सी, घी वाले पराठ्ठे यासोबतच आणखी एक पदार्थ हमखास आठवतो. तो म्हणजे सरसों दा साग और मक्के की राेटी... (healthy punjabi food) होय मोहरीच्या पानांपासून केलेली भाजी म्हणजे सरसों दा साग.... मात्र हा पदार्थ करण्याची पद्धत आणि मक्याच्या रोटीसोबत त्याची रंगणारी जुगलबंदी म्हणजे खवय्यांसाठी हिवाळ्यातले सूख.... (Benefits of eating sarso ka saag in winter) अहाहा... या पदार्थाविषयीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यातच सरसो का साग खाण्याची खरी मजा आहे.

 

पंजाबमध्ये वर्षातून अनेक दिवस थंडी असते. त्यामुळे तिथे हा पदार्थ सर्रास खाल्ला जातो. पण आपल्याकडे महाराष्ट्रात थंडी ३ ते ४ महिनेच असते. त्यामुळे आपण थंडीच्या दिवसांमध्ये या पदार्थाचा आस्वाद घेतला पाहिजे. सरसो का साग हा पदार्थ अतिशय उष्ण असतो. त्यामुळे थंडी व्यतिरिक्त अन्य दिवसांत जर तो खाल्ला तर त्यामुळे अनेक जणांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात अगदी बिनधास्तपणे हा पदार्थ चाखून पहा. खासदार सुप्रिया सुळे (famous food of Supriya Sule) यांनी एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केली आहे. त्यामध्येही त्यांनी असे लिहिले आहे की सरसो का साग हा पदार्थ म्हणजे दिल्लीतला (Delhi) त्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. मोहरीच्या पानांपासून बनविलेला हा पदार्थ अतिशय चवदार तर असतोच पण त्यापेक्षाही त्याचे खूप जास्त आरोग्यदायी फायदे आहेत. 

Recipe of Sarso ka Saag

हिवाळ्यात सरसो का साग खाण्याचे फायदे
Benefits of eating sarso ka saag in winter

- सरसो का साग या पदार्थात कॅल्शियम आणि पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया (digestion) चांगली होण्यासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी हा पदार्थ आवर्जून खावा.
- हृदयविकार टाळण्यासाठीही सरसो का साग खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण या पदार्थाच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचे (cholesterol) प्रमाण कमी होते, जे हृदयासाठी चांगले असते. 
- सरसो का साग आणि मक्के की रोटी हा आहार लो कॅलरी डाएट (low calary diet) मानला जातो. त्यामुळे वेटलॉससाठी (weight loss) प्रयत्न करणाऱ्यांनीही हा पदार्थ पोटभर खाण्यास हरकत नाही.


- सरसो का साग मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (fibers)असतात. त्यामुळे चयापचय (metabolism) क्रिया सुरळीत होण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त आहे.
- व्हिटॅमिन्स, खनिजे, प्रोटीन्सदेखील (proteins) या पदार्थात मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे आरोग्यासाठी सरसो का साग अतिशय पोषक मानला जातो. 
- सरसो का सागमध्ये व्हिटॅमिन ए (vitamin a) मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही तो पोषक ठरताे. 
 

Web Title: Punjabi Food: Benefits of eating sarso ka saag in winter, Healthy food Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.