Join us  

रवीने घुसळून लोणी काढून करा रवाळ तूप, दाणेदार तुपाची सोपी रेसिपी-बनते १० मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 12:25 PM

Pure Desi Ghee Recipe At home : भेसळयुक्त तूप खाण्याऐवजी घरातच ३ दिवस साय साठवून करा विकतसारखे दाणेदार तूप..

'खाल तूप तर येईल रूप' ही म्हण आपण ऐकलीच असेल. तूप (Ghee at Home) खाल्ल्याने आरोग्य खरंच सुधारते. तूप खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपण रोजच्या जेवणात तुपाचा वापर करतोच. वाफाळलेल्या भातासह तूप खाण्याची मज्जा न्यारी आहे. त्यातील ओमेगा -३ फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए मुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. रिफाइंड तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला जातो (Cooking Tips).

बहुतांश लोकं मार्केटमध्ये जाऊन विविध ब्रॅण्डच्या तुपाचा वापर करतात (Kitchen Tips and Tricks). पण त्यात भेसळ नसेल हे कशावरून? त्यामुळे भेसळयुक्त तूप खाण्याऐवजी आपण घरातच आजीच्या पद्धतीने तूप तयार करू शकता. इन्स्टंट पद्धतीने तूप तयार करण्याचे प्रकार आपण पाहिले असतील. आता पारंपारिक पद्धतीने तूप तयार करून पाहा(Pure Desi Ghee Recipe At home).

तूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

दुधाची साय

ना तेल - ना झंझट, टम्म फुगीर पुऱ्यांची सोपी रेसिपी; 100 % ऑईल-फ्री पुऱ्या खाऊन पाहाच..

थंड पाणी

कृती

सर्वप्रथम, साठवलेली साय एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. नंतर लाकडाच्या रवीने घुसळून घ्या. जो पर्यंत लोण्याचा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत घुसळत राहा. रवीने घुसळत असताना आपण त्यात काही बर्फाचे तुकडे आणि थंड पाणी घालू शकता. यामुळे लोण्याचा गोळा लवकर तयार होईल. जो पर्यंत साय दाणेदार होत नाही, तो पर्यंत घुसळत राहा.

घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त

नंतर हाताने लोण्याचा गोळा काढून घ्या, व त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. एका भांड्यात लोण्याचा गोळा घाला, व मध्यम आचेवर गॅस ठेवून कढवण्यासाठी ठेवा. सतत ५ मिनिटांनी आपण चमच्याने ढवळू शकता. जेणेकरून तूप भांड्याला चिकटणार नाही. १० ते १५ मिनिटात साजूक तूप तयार होईल. तूप तयार झाल्यानंतर गॅस बंद करा, व एखाद्या बॉटलवर चहाची गाळणी ठेवा. त्यात तूप ओतून घ्या. अशा पद्धतीने घरगुती तूप खाण्यासाठी रेडी. विकतचे आणण्यापेक्षा आपण या सोप्या पद्धतीने रवाळ तूप तयार करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स