Join us  

आमरस पुरीचा बेत करायचा? बघा १ सोपी ट्रिक- गार झाल्यानंतरही पुऱ्या राहतील टम्म फुगलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 4:46 PM

How To Make Perfect Fluffy Puri: आमरस पुरीचा बेत करायचा असेल तर यावेळी पुरी करताना ही एक मस्त ट्रिक लक्षात ठेवा. पुऱ्या मऊ पडणार नाहीत...(simple recipe of making poori)

ठळक मुद्दे अगदी गार झाल्यानंतरही पुऱ्या टम्म फुगलेल्याच असाव्यात यासाठी पुऱ्या करताना एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा.

सध्या आमरसाचे दिवस आहेत. त्यामुळे आमरस खाण्यासाठी आपल्याला कोणाकडून आमंत्रण येत असते किंवा आपण कोणाकडे तरी जात असतो. आता आमरसासोबत पोळी, पुरी, पुरणपोळी असे वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगवेगळ्या ठिकाणची परंपरा आहे. आमरस, बटाट्याची भाजी, पुरी, भजे, कुरडई असा मेन्यू या दिवसांत अनेकांकडे असतो. पुऱ्या तळताना छान टम्म फुगलेल्या असतात. पण काही वेळातच त्या मऊ पडतात, त्यांचा फुगीरपणा निघून जातो (how to make perfect fluffy puri). असं होऊ नये आणि अगदी गार झाल्यानंतरही पुऱ्या टम्म फुगलेल्याच असाव्यात यासाठी पुऱ्या करताना एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. (simple recipe of making poori)

 

गार झाल्यानंतरही पुऱ्या टम्म फुगलेल्या राहाव्या यासाठी टिप्स

पुऱ्या गार झाल्यानंतरही त्या तशाच टम्म फुगलेल्या, कुरकुरीत राहाव्या, मऊ पडू नयेत यासाठी काय करावं, याविषयीचा व्हिडिओ Priyas Kitchen या यु ट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारे ५ पदार्थ, डॉक्टर सांगतात रोज १ खाल्ला तरी हृदय राहील ठणठणीत

पुऱ्या करण्यासाठी आपण जे पीठ घेतो त्यामध्ये साधारण १ कप गव्हाचं पीठ, १ कप रवा, १ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून पिठी साखर, थोडंसं मीठ आणि २ चमचे अगदी कडकडीत मोहन टाकावं.

बेसन पीठ टाकल्यामुळे पुऱ्यांना खमंगपणा येतो.

पिठी साखर टाकल्यामुळे पुऱ्यांना छान चमकदारपणा आणि कुरकुरीतपणा येतो. तसेच त्या गार झाल्यानंतरही बराच वेळ तशाच छान फुगलेल्या राहतात. 

 

पुऱ्या तळल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये त्या पेपर नॅपकिनवर किंवा वर्तमान पत्राच्या घडीवर ठेवल्या जातात. पुऱ्यांमधील तेल शोषलं जावं हा त्यामागचा एक उद्देश असतो. पण असं केल्यामुळे पुऱ्या मऊ पडतात.

आपल्या शरीराला कोणत्या व्हिटॅमिन्स, मिनरल्सची गरज आहे ते कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स

वर्तमान पत्र किंवा पेपर नॅपकिनमुळे त्यांच्यातला कुरकुरीतपणा शोषला जातो. त्यामुळे पुऱ्या कधीच अशाच पद्धतीने ठेवू नका. त्यांच्यातलं ते गळून जाण्यासाठी एक वाटी घ्या. त्या वाटीवर चाळणी ठेवा. आणि त्यावर तळून घेतलेल्या पुऱ्या ठेवा. त्यांच्यातलं जास्तीचं तेल निथळून जाईल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती