सकाळची घाई होऊ नये म्हणून आपण रात्रीच कणिक मळून ठेवतो. कणिक मळून झाल्यानंतर आपण फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतो. शिवाय सकाळी कणकेचा गोळा लाटून झटपट पोळ्या तयार करतो. तर काही वेळेला कणिक शिल्लक राहते. कणिक फेकून देण्याऐवजी आपण साठवून ठेवतो, व दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या तयार करतो (Fresh Dough). पण कणिक फ्रिजमध्ये स्टोर केल्यानंतर काळपट पडते. मग ते कणिक वापरावं की नाही? (Kitchen Tips and Tricks) असा प्रश्न गृहिणींच्या मनात उद्भवते.
कणिक साठवून ठेवल्यानंतर त्याच्या चवीमध्ये देखील बदल जाणवते. जर आपल्याला कणिक अधिक काळ साठवून ठेवायचे असेल तर, काही टिप्स फॉलो करा (Cooking Tips). या टिप्समुळे कणिक काळपट पडणार नाही यासह, सॉफ्ट आणि फ्रेश राहील(Quick 5 Tips To Keep Atta Dough Fresh For Long).
कणिक फ्रिजमध्ये स्टोर करताना लक्षात ठेवा काही टिप्स
- जर उरलेली कणिक अधिक वेळ फ्रेश आणि त्यावर काळपट डाग पडू नये असे वाटत असेल तर, स्टोर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. यासाठी कणिक स्टोर करण्यापूर्वी त्यावर थोडे ब्रशने तेल लावा. शिवाय हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा. यामुळे कणिक कडक होणार नाही. शिवाय अधिक वेळ मऊ राहील.
कपभर बदामाची करा पौष्टीक वडी; बुद्धी होईल तीक्ष्ण-आरोग्य राहील सुदृढ; मिळतील फायदेच-फायदे..
- बऱ्याचदा घाईगडबडीत अधिक कणिक मळले जाते. त्यामुळे फ्रिजमध्ये स्टोर करण्याची वेळ येते. फ्रिजमध्ये स्टोर करण्यापूर्वी एका भांड्यात थोडे पाणी घाला. त्यात कणकेचा गोळा ठेवा. वरूनही हलकेच पाणी शिंपडा म्हणजे कणिक काळपट आणि कडक होणार नाही.
- उरलेले कणिक फ्रिजमध्ये स्टोर करण्यापूर्वी प्लॅस्टिकच्या रॅपरने गुंडाळून कव्हर करा. नंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. यामुळे कणिक १ ते २ दिवस अधिक फ्रेश राहील.
- जर सकाळसाठी आपण कणिक मळून ठेवत असाल तर, थोडे घट्ट मळून ठेवा. शिवाय कणिक मळताना कोमट पाणी, दुधाचाही आपण वापर करू शकता. यामुळे पोळ्या मऊ आणि छान फुलतील.
कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट
- जर कणिक काळे पडले असेल तर, समजून जा शिळे झाले आहे. फ्रिजमध्ये स्टोर केलेले २ ते ३ दिवसांचे कणकेचा वापर करणे टाळा. यामुळे आरोग्य बिघडू शकते.