Join us  

फक्त चिवडा कशाला? कुरमुऱ्याचे ‘हे’ ४ पौष्टिक पदार्थ नाश्त्याला खा, पोट भरेल -वजनही वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 10:00 AM

Quick and Easy 4 Murmura Easy Recipe : कुरमुऱ्याचे हे ४ चमचमीत पदार्थ खाऊन पाहिलेत का?

कुरमुरे कोणाला नाही आवडत. कुरमुऱ्याचे कुरकुरीत पदार्थ आपण खातो (Cooking Tips). कुरमुऱ्याचा चिवडा किंवा भडंग चवीला चमचमीत आणि पोटही भरते (Food). घरात चिवडा शिल्लक असेल तर, आपण त्याचा चिवडा करतो (Mumura). पण याव्यतिरिक्त आपण कुरमुऱ्याचे विविध पदार्थ करू शकता.

कुरमुऱ्याचा चिडवा, भडंग व्यतिरिक्त आपण त्याला नवा ट्विस्ट देऊ शकतो. जर कुरमुऱ्याचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर, या ४ प्रकारचे पदार्थ खाऊन पाहा. चमचमीत पदार्थ अगदी काही मिनिटात तयार होतील. शिवाय नाश्ताही पौष्टीक आणि भरपेट होईल(Quick and Easy 4 Murmura Easy Recipe ).

ओली भेळ

कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, भाज्या, उकडलेला बटाटा आणि कुरमुरे घालून आपण ओली भेळ तयार करू शकता. यासाठी विशेष मेहनतीची गरज नाही. सायंकाळची भूक भागवण्यासाठी ओली भेळ परफेक्ट आहे.

वॉशिंग मशिनचीही गरज नाही, झटपट धुता येतील बादलीभर कपडे-लक्षात ठेवा ५ गोष्टी

भेळपुरी

जर आपण फिटनेस फ्रिक असाल आणि सायंकाळची भूक लागली असेल तर, भेळपुरी हा आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यात कुरमुरे, कांदा, चटपटीत मसाले, शेवचा वापर होतो.

इडली

अनेक लोक डाळ - तांदूळ भिजत न घालता इन्स्टंट इडली करतात. जर आपल्याला डाळ - तांदूळ भिजत घालून इडली करण्याचा कंटाळा आला असेल तर, एकदा कुरमुऱ्याची इडली करून पाहा. अगदी काही मिनिटात इन्स्टंट इडली तयार होईल.

कितीही प्रेम असो जोडीदार ‘या’ ५ गोष्टी करत असेल तर समजा तुम्ही टॉक्सिक रिलेशनिशपमधेच आहात!

आलू टिक्की

कुरमुऱ्याची आपण आलू टिक्कीही तयार करू शकता. यासाठी कुरमुरे भिजत घालून त्यात उकडलेले बटाटे, मसाले आणि भाज्या घालून टिक्की तयार करू शकता. आलू टिक्की बनवायला सोपी आणि चवीला पौष्टीक असते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स