आजकाल घराघरांतील महिलांना घरातील कामांबरोबरच बाहेरील कामंही पाहावी लागतात. ऑफिसवरून घरी आल्यानंतर स्वंयपाक करायचा म्हणजे खूपच कठीण काम. (Easy Kitchen Tips) जर ऑफिसहून घरी यायला उशीर झाला तर कधी स्वयंपाक होईल याची काळजी असते. दिवसभराच्या थकव्यानंतरही रात्रीचं जेवण बनवण्याबाबत बऱ्याच महिला चिंतेत असतात. सोप्या कुकिंग टिप्स तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. म्हणजेच पटकन स्वयंपाक तयार होईल आणि तुमचा वेळही वाचेल. (Cooking Hacks)
1) सगळ्यात आधी लिस्ट बनवा
किचनचं काम सुरू करण्याआधी एक लिस्ट बनवा की तुम्हाला जेवणात नक्की कोणते पदार्थ बनवायचे आहेत. ही लिस्ट तयार असेल तर ऐनवेळी धांदल होणार नाही आणि तुम्ही पटकन कामाला लागाल
2) चांगल्या क्वालिटीचे चॉपर आणि सुरी वापरा
किचनमध्ये भाज्या किंवा फळं कापण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या चॉपर्सचा वापर करा, यामुळे तुमच्या कामाचा वेळ वाचेल आणि पटकन स्वयंपाक बनवून होईल.
3) मशिनचा उपयोग
किचनचं काम लवकर संपवण्यासाठी तुम्ही मिक्सर, ब्लेंडर किंवा प्रेशर कुकर यांसारख्या भांड्यांचा आणि मशिनचा वापर करू शकता. यामुळे काम लवकर होईल.
4) जास्त भांडी खराब होणार नाहीत याची काळजी घ्या
जर तुम्ही स्वंयपाक करताना अनावश्यक भांड्याचा जास्त वापर केला तर धुवायला सुद्धा जास्त भांडी जमा होतील. जसंजसं काम उरकेल तसं एक एक भाडं धुवा जेणेकरून जास्त भांडी गोळा होणार नाही.
5) मायक्रोव्हेव
गॅसवर जेवण बनवताना खूप वेळ लागतो. मायक्रोव्हेह किंवा एअर फ्रायरसारख्या किचन अप्लायंसचा वापर करा.
6) वस्तू जागच्याजागी ठेवा
स्वयंपाकघरात वस्तू पसरवून ठेवू नका, तसेच स्वयंपाकासाठी लागणार्या वस्तू गॅसजवळ ठेवा, मगच स्वयंपाक सुरू करा. जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा वस्तू आणायला जावे लागणार नाही.
7) सकाळी जास्तीचे जेवण बनवा
सकाळी बनवलेली डाळ आणि भाजी रात्रीसाठी उरली असेल तर तुम्हाला परत भाजी आणि डाळ बनवावी लागणार नाही. जर रात्री खूपच उशीर झाला असेल तर फक्त चपाती किंवा भात बनवला तरी काम होईल.