कोबी बाराही उपलब्ध असणारी भाजी आहे. काहींना कोबीचे पदार्थ आवडतात. तर काही नाक मुरडत याची भाजी खातात. कोबी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन के व पोटॅशियम आढळते. कोबी खाल्ल्याने पचन सुधारते. कोबीचे अनेक प्रकार केले जातात. कोबीची भाजी, कोबीची भजी, कोबीची वडी. हे पदार्थ चवीने खाल्ले जातात.
कोबीची भाजी करण्याची पद्धत देखील वेगवेगळ्या आहेत. अनेकदा आपण पाहिलं असेल, गावाकडील लग्नाच्या मेन्यूमध्ये कोबीची भाजी असतेच. या भाजीला एक वेगळीच चव असते. घरी आपण या पद्धतीची कोबीची भाजी करून पाहतो, पण तशा पद्धतीची कोबीची भाजी तयार होत नाही. जर आपल्याला लग्नाच्या मेन्यूमध्ये असणारी कोबीची भाजी घरी तयार करून पाहायची असेल तर, या रेसिपीला नक्की फॉलो करून पाहा(Quick and Tasty Cabbage Bhaji with grated coconut).
कोबीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
कोबी
चणा डाळ
लसूण
जिरं
बेसनाचे मऊसूत तलम लाडू करण्यासाठी घ्या खास रेसिपी, खमंग बेसन लाडू गणपतीत नैवेद्याला हवाच..
हिरव्या मिरच्या
मोहरी
तेल
कडीपत्ता
हळद
हिंग
किसलेलं खोबरं
मीठ
कृती
सर्वप्रथम, एका वाटीमध्ये एक कप चणा डाळ घ्या, त्यात एक कप पाणी घालून भिजत ठेवा. त्यानंतर खलबत्त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, एक चमचा जिरं, ४ ते ५ हिरव्या मिरच्या घालून चेचून घ्या. व चेचलेलं हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून ठेवा. कोबी बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात ४ ते ५ कडीपत्त्याची पानं, व लसूण - मिरचीचं वाटण घालून चमच्याने मिक्स करा. त्यानंतर त्यात एक चमचा हळद, भिजेलेली चणा डाळ आणि चिमुटभर हिंग घालून छान परतवून घ्या.
गोकुळाष्टमी विशेष : दही पोहे करण्याची घ्या पारंपरिक रेसिपी, दही पोह्याचा नैवेद्य तर हवाच..
त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोबी, चवीनुसार मीठ व कोथिंबीर भुरभुरून साहित्य एकजीव करा. साहित्य एकजीव झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटं भाजी वाफेवर शिजवून घ्या. शेवटी किसलेलं ओलं खोबरं घालून पुन्हा २ मिनिटांसाठी झाकण ठेऊन एक वाफ द्या. तयार भाजी डिशमध्ये काढून सर्व्ह करा. अशा प्रकारे वाफेवरची कोबीची भाजी खाण्यासाठी रेडी. आपण ही भाजी चपाती, भाकरी, किंवा भातासह देखील खाऊ शकता.