Join us

Carrot Halwa : गाजर न किसता, न कापता ५ मिनिटात करा गाजर हलवा; इंस्टंट रेसेपी, जीभेवर रेंगाळेल चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 15:47 IST

How To Make Gajar Ka Halwa in Pressure Cooker : गाजर खाल्ल्याने केसांसाठी आवश्यक बायोटिन मिळते. पोटॅशियम भरपूर असल्याने रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठीही हे चांगले आहे.

हिवाळ्यात गाजरचा हलवा खाल्ला नाही असं कोणीही नसेल.  ताजे गाजर बाजरात खूप मिळतात.  गाजराचा हलवा करायचं म्हटलं की गाजर किसावे लागतात. त्यासाठी बराचवेळ लागतो, हात दुखतात ते वेगळं. रोजची बाकीची कामं सांभाळून तासनतास गाजर किसायचे म्हणजे खूपच त्रासदायक वाटतं. (Cooking Tips & Hacks) गाजराचा हलवा बनवण्याची सोपी  पद्धती या लेखात पाहूया. (Carrot Halwa Without Mawa recipe) गाजराचा हलवा  करण्यासाठी तुम्ही कुकरचा वापर करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सालं व्यवस्थित काढून घ्यावी लागतील मग कापून किंवा अख्खे शिजवायला ठेवू शकता.(Quick Gajar ka Halwa)

गाजर खाण्याचे फायदे

१) गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन देखील असतात. जे दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवतात. याशिवाय हे गुणधर्म डोळ्यांच्या स्नायूंना तणाव आणि हानिकारक किरणांपासूनही संरक्षण देतात.

२) हेल्थलाइननुसार, गाजर खाल्ल्याने चरबी कमी होण्यासही मदत होते. कारण, यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. गाजरांमध्ये भरपूर पाणी असते, जे चरबी-बर्निंग चयापचय गतिमान करते.

ना मावा ना साखरेचा पाक; फक्त १ कप दुध वापरून करा १ किलोंची स्वादीष्ट मिठाई

३) गाजर खाल्ल्याने केसांसाठी आवश्यक बायोटिन मिळते. पोटॅशियम भरपूर असल्याने रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठीही हे चांगले आहे.

४) अनेक अभ्यासांमध्ये, गाजर प्रोस्टेट, पोट आणि आतड्याच्या कर्करोगापासून संरक्षणात्मक असल्याचे आढळले आहे. ते खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न