स्वंयपाकघरातील कामं दिसायला कमी असतात पण ही एकामागोमाग एक कामं आवरायला बराच वेळ लागतो. (What are the best kitchen hacks) हे खूप कठीण असतं पण घरातली काम करण्यात आपला बराचवेळ वाया जातो. काही सोपे किचन हॅक्स तुमचं रोजचं काम अधिक सोपं करू शकतात. (What are some good kitchen tips) काम पटकन आवरलं जाण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर कामाचा वेळ वाचू शकतो आणि स्वयंपाकघरही स्वच्छ राहील. (Cooking Tricks & Tips)
१) डाळ कुकरच्या झाकणाला लागते?
जर डाळ बनवताना सतत कुकरच्या झाकणाला लागून पाणी गळत असेल आणि कुकरचं झाकण खराब होत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवल्यानंतर त्यात स्टिलची एक लहान वाटी ठेवा. असं केल्यानं डाळ बाहेर येणार नाही.
२) किचनमध्ये ठेवलेल्या कात्रीची धार कमी झालीये?
जर स्वयंपाकघरातील कात्री चांगलं काम करत नसेल आणि त्यांची धार कमकुवत झाली असेल तर तुम्ही ही युक्ती वापरू शकता. यासाठी मिठाच्या डब्यात दोन-तीन मिनिटे कात्री ठेवा. असे केल्याने कात्रीची धार खूप तीक्ष्ण होईल.
३) भात शिजवताना पाणी जास्त झालं तर काय कराल?
तांदूळशिजवताना त्यात भरपूर पाणी उरले असेल तर भातामध्ये ब्रेडचा तुकडा काही वेळ असाच राहू द्या आणि गॅस बंद करा. ब्रेड बाहेर काढल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स टाकूनही खाऊ शकता.
४) मीठाच्या भांड्याला ओलावा आला असेल तर काय कराल?
मिठाच्या भांड्यात ओलावा असल्यास सर्व मीठ ओले होते. ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही तांदळाचे दाणे भांड्यात टाकता. तांदळाचे दाणे ओलावा शोषून घेतात आणि जड असल्याने मीठ दाबून टाकतात. यामुळे मीठ सहज बाहेर येऊ शकते.
रोज डाळ -भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटात करा चवदार लेमन राईस, सोपी रेसिपी
५) लसूण सोलण्याची ट्रिक
लसूण सहज सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या काही वेळ गरम पाण्यात टाका. नंतर काही वेळाने जेव्हा तुम्ही लसूण सोलून घ्याल तेव्हा कोणताही प्रयत्न न करता फक्त वरचा भाग कापून संपूर्ण साल बाहेर येईल.
६) चटणीचा रंग काळा पडतो?
चटणी बनवल्यानंतर जर रंगा काळा पडत असेल तर चटणी बनवताना त्यात १ चमचा दही घाला. यामुळे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही तयार चटणीचा रंग काळा पडत नाही.
या नव्या पद्धतीनं इडलीचं पीठ आंबवून करा मऊ, पांढऱ्याशुभ्र इडल्या; अप्रतिम चव, सोपी रेसिपी
७) सफरचंद काळं पडतं?
सफरचंद बराचवेळ कापून ठेवल्यास ते काळे पडते. सफरचंद ताजे राहण्यासाठी आणि ते काळे होऊ नये यासाठी तुम्ही ही युक्ती अवलंबू शकता. यासाठी चिरलेल्या सफरचंदाचे तुकडे मीठ आणि लिंबाच्या थंड पाण्यात ठेवा. यामुळे सफरचंद काळं पडणार नाही.