Join us  

कांद्याची झणझणीत चटणी करा, भाजी नसली तरी जेवण होईल पोटभर आणि चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 2:16 PM

Quick Onion Chutney Recipe, Makes Meal Delicious कांद्याची चटणी करण्याची सोपी झटपट रेसिपी

कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात होतो. कांद्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे आणि गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम आणि पोटॅशियम कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.

कांद्याचा वापर फक्त फोडणीमध्ये करण्यात येत नसून, त्याचा वापर भजी, पराठा किंवा लोणचे करण्यात देखील होतो. पण आपण कधी कांद्याची झणझणीत चटणी खाऊन पाहिली आहे का? कांद्याची अनेक प्रकारे चटणी केली जाते. कांद्याची चवदार चटणी आपण इडली, डोसा किंवा पराठासोबत खाऊ शकता(Quick Onion Chutney Recipe, Makes Meal Delicious).

कांद्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

३ मोठे आकाराचे कांदे

तेल

जिरं

धणे

चिंच

लाल काश्मिरी मिरची

चणा डाळ

गरमागरम इडली सांबार तर खाताच आता खाऊन पाहा इडली पकोडा, पावसाळ्यात खा नव्या पद्धतीची भजी

उडीद डाळ

मोहरी

कडीपत्ता

मीठ

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक चमचा जिरं, व धणे घालून भाजून घ्या. नंतर त्यात ३ मोठे आकाराचे लांब काप केलेले कांदे घाला. कांदा लालसर भाजून झाल्यानंतर त्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, एक टेबलस्पून चिंच, व ३ ते ४ लाल काश्मिरी मिरच्या घालून भाजून घ्या. भाजून घेतलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. व त्याची पेस्ट तयार करा.

पाकातले रवा लाडू करायची ही घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी, लाडू ना बिघडतील ना कडक होतील

फोडणीसाठी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून चणा डाळ, एक टेबलस्पून उडीद डाळ, २ टेबलस्पून मोहरी, कडीपत्ता घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात तयार कांद्याची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून चमच्याने मिक्स करा. २ मिनिट गरम करा, व एका बाऊलमध्ये चटणी काढून ठेवा. अशा प्रकारे पराठा, इडली, डोश्यासोबत खाण्यासाठी चमचमीत कांद्याची चटणी तयार. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स